AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? पहिले नाव समोर; दिल्लीत मोठ्या घडामोडी!

जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? पहिले नाव समोर; दिल्लीत मोठ्या घडामोडी!
ramnath thakur
| Updated on: Jul 24, 2025 | 12:13 AM
Share

Ramnath Thakur : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनखड यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत उपराष्ट्रपतीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच आता बिहार राज्यातीलच एका बड्या नेत्याची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता बिहारच्या या नेत्याचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये आले आहे.

मनाथ ठाकूर उपराष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार?

धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. सध्या या पदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. मात्र बुधवारी (23 जुलै) जे पी नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. नड्डा आणि ठाकूर यांच्या भेटीचा हा प्रसंग फारच विशेष मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

रामनाथ ठाकूर मोदींच्या जवळचे नेते

कर्पुरी ठाकूर यांनी केलेल्या कामामुळे रामनाथ ठाकूर यांचे बिहार तसेच संपूर्ण देशात एक वेगळे वजन आहे. रामनाथ ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे नेते असल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी केंद्र सरकारने रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी चालू

दरम्यान, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाकडून नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. तशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले तसेच नियुक्त केलेले खासदार मदतान करू शकतील. आमची तयारी पूर्ण झाल्यावर लवकरात लवकरच उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात
अंत्यसंस्कारानंतर कार्यकर्त्यांचा टाहो; पार्थ, जय पवारांनी जोडले हात.