VIDEO : पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला आहे. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले […]

VIDEO : पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याने जितेंद्र आव्हाडांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला आहे. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता.

बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार अशी धमकीच दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘शिवद्रोही ब.मो. पुरंदरेंना पद्मविभूषण जाहिर, छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट, महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय’. पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा, शिवसन्मान परिषदा घेणार. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांच्या नावे हॅशटॅग केला आहे.

अशा दोन पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यानही जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरंदरेंना विरोध केला होता. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि जीवनावर वादग्रस्त लिखान केलं आहे. तसेच त्यांच्यावर हा पण आरोप आहे की, त्यांनी शिवाजींचे गुरु समजले जाणारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे.

कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.