कोरोना काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन, पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करा, अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

त्याच बरोबर 'फ्रंटलाईन वर्कर्स'साठीच्या इतर सोयी-सुविधाही त्यांना मिळतील, अशी फेसबुक पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे.

कोरोना काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन, पत्रकारांना 'फ्रंटलाईन वर्कर्स' म्हणून घोषित करा, अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मनसे नेते अमित ठाकरे


मुंबई : राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबतचे पत्र लिहिले आहे. कोरोना संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या “राज्यातील पत्रकार बांधवांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करावं”, अशी मागणी अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (Journalists should be declared COVID-19 frontline workers MNS amit thackeray demand)

कोरोना संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या “राज्यातील पत्रकार बांधवांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करावं”, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्ये पत्रकारांचा समावेश झाल्यास त्यांचे लसीकरण तत्काळ होईलच. पण त्याच बरोबर ‘फ्रंटलाईन वर्कर्स’साठीच्या इतर सोयी-सुविधाही त्यांना मिळतील, अशी फेसबुक पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे. त्यासोबत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या पत्राचा फोटोही यात टाकला आहे.

अमित ठाकरेंचे संपूर्ण पत्र 

प्रति,

उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.

यांसी जय महाराष्ट्र!

विषय : राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करुन त्यांना कोविड लसीकरण आणि इतर सुविधा मिळण्याबाबत…

महोदय,

एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी आपणास लिहित आहे. कोरोना महासाथीविरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस यांप्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. करोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत आणि वार्तांकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत.

दु्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना करोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसंच वार्तांकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे, ही आमची आग्रहाची मागणी आहे.

पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांचे लसीकरण करण्यासाठी आपण जिल्हा तसंच तालुका पातळीवरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे, ही विनंती.

आपला नम्र,

अमित ठाकरे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

(Journalists should be declared COVID-19 frontline workers MNS amit thackeray demand)

संबंधित बातम्या : 

सर्व कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा; आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI