AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : ‘सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या…’, मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे, त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. "उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील"

Raju Patil : 'सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या...', मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Eknath Shinde
| Updated on: Jan 21, 2025 | 12:36 PM
Share

“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?. आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड, पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?. हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं. मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.

ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

त्या रागापोटी हे ट्विट

“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली. मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.

लोकांना ते माहित नाही

आमदार राजू पाटील म्हणाले की, “पालकमंत्री पद कुठलं पाहिजे, गडचिरोली, पालघर, रायगड. कारण रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतय पालघरला. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा हे आमच्यासारख्या राजकारणाला माहित आहे. लोकांना ते माहित नाही” अशा शब्दात राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...