AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katol Vidhan Sabha 2024 : काटोलमध्ये अनिल देशमुखांना कोण हरवणार?

Katol Vidhan Sabha 2024 : काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसक़डून अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण भाजपाचा उमेदवार अजून ठरत नाहीय. काटोलच्या उमेदवारीसाठी भाजपामध्ये अंतर्गत स्पर्धा आहे. काटोलच्या मागच्या तीन विधानसभा निवडणुकांचा निकाल काय आहे? जाणून घ्या..

Katol Vidhan Sabha 2024 : काटोलमध्ये अनिल देशमुखांना कोण हरवणार?
अनिल देशमुखImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 25, 2024 | 3:29 PM
Share

रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला काटोल विधानसभा मतदारसंघ मागच्या दोन वर्षांपासून सतत चर्चेत आहे. याला कारण आहे अनिल देशमुख. काटोल विधानसभा मतदारसंघ विदर्भात येतो. अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध मंत्रीपद भूषवली आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी अनिल देशमुख यांची ओळख. 2019 साली महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर आल्यानंतर अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री झाले. अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असताना त्यांच्यावर वसुलीचे आरोप झाले. या प्रकरणात त्यांना काही काळ तुरुंगात काढावा लागला. आता काटोल विधानसभा क्षेत्रातून अनिल देशमुख निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अनिल देशमुख यांचं नाव आहे.

अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेले शाब्दीक वादही चांगलेच गाजले. त्यावेळी ते फडणवीसांना त्यांच्या होम पीचवर म्हणजे नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आव्हान देणार असं बोलल जात होतं. पण अनिल देशमुख काटोलमधूनच लढणार आहे. काटोल या विधानसभा क्षेत्रावर नेहमीच देशमुख कुटुंबाच वर्चस्व राहिलं आहे. अनिल देशमुख हे 1995 सालापासून सातत्याने काटोल विधानसभा क्षेत्रातून निवडणूक जिंकले आहेत. अपवाद फक्त 2014 सालचा. त्यावेळी अनिल देशमुख यांना त्यांचा पुतण्या आशिष देशमुखने पराभूत केलं. पण 2019 मध्ये अनिल देशमुख पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

काटोलच्या जागेसाठी भाजपामध्ये स्पर्धा

महायुतीमध्ये काटोलची जागा भाजपाकडे आहे. भाजपाने अजून या जागेवर उमेदवाराची घोषणा केलेली नाही. काटोलच्या जागेसाठी चरणसिंग ठाकूर आणि आशिष देशमुख दोघांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. चरणसिंग ठाकूर यांना काटोलमधून तिकीट निश्चित झाल्याची चर्चा सुरु होताच आशिष देशमुख यांनी तातडीने मुंबई गाठून हालचाली केल्या. आशिष देशमुख 28 ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

काटोलमध्ये कुणबी, तेली समाजाचे प्राबल्य आहे. बौद्ध, मागासवर्गीय मतदारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

कोटलच्या तीन विधानसभा निवडणुकांचे निकाल

  • 2009 मध्ये काटोलमधून अनिल देशमुख विजयी झाले. त्यांना 68,143 मतं मिळाली.
  • त्यावेळी आरपीआय(A) च्या तिकीटावर लढणाऱ्या चरणसिंग ठाकूर यांना दुसऱ्या क्रमांकाची 35,940 मतं मिळाली.
  • 2014 मध्ये भाजपाचे आशिष देशमुख या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांना 70,344 मतं मिळाली.
  • त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख 64,787 मतं मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.
  • 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अनिल देशमुख पुन्हा विजयी झाले. त्यांना 96,842 मतं मिळाली.
  • भाजपाचे चरणसिंग ठाकूर 79,785 मतं मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.