राहुल गांधी अन् काँग्रेसला मोठा धक्का, ए के अँटोनी यांच्या मुलाचा राजीनामा, काय घडतंय?

या राजीनाम्यामुळे दक्षिण भारतातून काँग्रेसच्या हातून एक तरुण नेता गमावल्याची चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी अन् काँग्रेसला मोठा धक्का, ए के अँटोनी यांच्या मुलाचा राजीनामा, काय घडतंय?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 25, 2023 | 11:28 AM

तिरुअनंतपरम (केरळ): राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसला (Congress) धक्का देणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. दक्षिण भारतातले काँग्रेसचे दिग्गज नेते ए के अँटोनी यांचा मुलगा अनिल के अँटोनी (Anil K Antony) यांच्या मुलाने आपण पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रतिक्रिये संदर्भातलं ट्विट डिलीट करण्याचा दबावही त्यांच्यावर टाकण्यात येत होता. त्यामुळे अनिल अँटोनी यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

काय आहे नेमकं कारण?

अनिल के अँटोनी यांनी आतापर्यंत केरळ काँग्रेस कार्यकारिणीचे डिजिटल कम्युनिकेशन हाताळले आहे. केरळमधील काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी नुकताच एक निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ म ध्ये झालेल्या दंगलीवर बीबीसीने तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्याची घोषणा केरळ काँग्रेसच्या विविध शाखांनी केली. यावरून अनिल अँटोनी यांनी विरोधी प्रतिक्रिया दिली.

भाजपसोबत मतभेद असले तरी, बीबीसी आणि इराक युद्धामागे ज्यांची बुद्धी आहे, ते ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांच्या मतांचं समर्थन करत आहेत. भारतातील सार्वभौमत्व यामुळे धोक्यात येत असल्याचं ट्विट अनिल अँटोनी यांनी केलं होतं.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ही डॉक्युमेंटरी दाखवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे या प्रकरणी हस्तक्षेप करत स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.

राजीनाम्याचं ट्विट

दरम्यान, बीबीसी डॉक्युमेंटरीच्या विरोधी आणि भाजपला पाठिशी घालणारे ट्विट डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचं कारण देत अनिल अँटोनी यांनी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा दिली आहे.

या राजीनाम्यामुळे दक्षिण भारतातून काँग्रेसच्या हातून एक तरुण नेता गमावल्याची चर्चा सुरु आहे.