‘समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक, त्यांना लाज वाटायला हवी’, किरीट सोमय्यांचा घणाघात

| Updated on: Oct 27, 2021 | 8:51 PM

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधलाय.

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक, त्यांना लाज वाटायला हवी, किरीट सोमय्यांचा घणाघात
किरीट सोमय्या, शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिकाच सुरु ठेवलीय. अशात प्रभाकर साईल या पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपावरुन समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आलीय. या संपूर्ण प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधलाय. (Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar)

महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.

‘स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम’

सिंचन घोटाळ्याची चर्चा, स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम सुरु आहे. त्यात जर काही घोटाळा असेल तर मग कारवाई करा. नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊथ यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे. मी त्या पत्राला दमडीचीही किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे काढणार. उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी – फडणवीस

नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे. ते स्पष्टपणे समोर येत आहे आहे. तपास अधिकाऱ्यांना टार्गेट करणे हे योग्य नाही. कारण, ते घटनात्मक पदावर आहेत. घटनात्मक पदावरचा माणूस सांगेल की मी याला जेलमध्ये टाकणार, कारवाई करणार, सर्टिफिकेट खोटे आहे. परत आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे. हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलीच केस टिकणार नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला तर तेही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

इतर बातम्या :

समीर वानखेडेंची तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी होणार? NCB चे वरिष्ठ म्हणाले, तपास पुढे जाऊ द्या

आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?

Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray and Sharad Pawar