ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला करणारा सापडला, मध्यरात्री शेतातून पकडला!

ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूहल्ला केल्यानंतर आरोपी अजिंक्य (Ajinkya Tekale) हा कळंब तालुक्यातील पाडोळी या गावातील एका शेतात लपून बसला होता.

ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला करणारा सापडला, मध्यरात्री शेतातून पकडला!

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अजिंक्य टेकाळे (Ajinkya Tekale) याला उस्मानाबाद पोलिसांनी पकडलं.  ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूहल्ला केल्यानंतर आरोपी अजिंक्य (Ajinkya Tekale) हा कळंब तालुक्यातील पाडोळी या गावातील एका शेतात लपून बसला होता. पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांनी याबाबतची माहिती दिली.

मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास पोलिसांनी आरोपी अजिंक्यला शेतातून पकडलं.

ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांचीही 2006 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 13 वर्षांनी आता ओमराजे निंबाळकर यांच्यावरही खूनी हल्ला झाल्याने, त्यांच्या जीवावर कोण उठलंय हा प्रश्न आहे.

ओमराजेंवर चाकूहल्ला

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं बुधवारी 16 ऑक्टोबरला ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम राजे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली.

खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला.

संबंधित बातम्या 

BREAKING – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला   

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार  

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने वाचलो : ओमराजे निंबाळकर 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI