AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना INDIA मध्ये ना NDA मध्ये… त्या आठ राजकीय पक्षांचं काय चाललंय?; तिसरी आघाडी स्थापन करणार?

या आठ राजकीय पक्षांमध्ये बीजद, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, जेडीएस, अकाली दल, बहुजन समाज पार्टी, एमआयएम आणि एआययूडीएफ या पक्षांचा समावेश आहे. यातील काही पक्षांची आपल्या बळावर राज्यात सत्ता आहे.

ना INDIA मध्ये ना NDA मध्ये... त्या आठ राजकीय पक्षांचं काय चाललंय?; तिसरी आघाडी स्थापन करणार?
bspImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2023 | 12:08 PM
Share

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : येत्या 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने एकूण 38 राजकीय पक्षांना एका छताखाली आणलं आहे. तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडियाने 26 पक्षाने एकत्रित केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंडिया विरुद्ध एनडीए असा सामना रंगणार आहे. असं असलं तरी देशातील आठ महत्त्वाच्या पक्षांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाहीये. हे आठही पक्ष कोणत्यातच आघाडी किंवा युतीत सामील झालेले नाहीत. मात्र, या पक्षांचं उपद्रव मूल्य अधिक आहे. त्यामुळे या पक्षांचा नेमका कुणाला फटका बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या आठ राजकीय पक्षांमध्ये बीजद, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, जेडीएस, अकाली दल, बहुजन समाज पार्टी, एमआयएम आणि एआययूडीएफ या पक्षांचा समावेश आहे. यातील काही पक्षांची आपल्या बळावर राज्यात सत्ता आहे. काही पक्षांनीही आपल्या बळावर राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे. यातील काही पक्ष काँग्रेससोबत तर काही पक्ष एनडीएसोबत राहिलेले आहेत. मात्र, तरीही या पक्षांनी कोणत्याही आघाडी किंवा युतीत भाग घेतलेला नाहीये. आता हे आठही पक्ष कुणासोबत जाणार? हे पक्ष स्वबळावर लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाची किती ताकद?

या सर्वच राजकीय पक्षांचं आपआपल्या राज्यात आणि काही प्रमाणात देशात राजकीय वर्चस्व राहिलं आहे. हे सर्व पक्ष दखलपात्र असे आहेत. ओडिशात बीजू जनता दलाचं सरकार आहे. नवीन पटनायक हे मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक यांनी पाच वेळा आपल्या बळावर ओडिशात सत्ता स्थापन केलेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पटनायक यांच्या बीजू जनता दलाला 147 पैकी 112 जागा मिळाल्या होत्या. राज्यात लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत. त्यापैकी बीजू जनता दलाने 12 तर भाजपचे आठ आणि काँग्रेसने फक्त एक जागा जिंकलेली आहे. यावरून बीजू जनता दलाची ताकद किती मोठी आहे हे दिसून येतं.

तेलंगनात चंद्रशेखर राव, आंध्रात वायएसआर

तेलंगनात टीआरएसचं सरकार आहे. के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील 119 विधानसभांपैकी 90 जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. तर लोकसभेच्या 17 पैकी 9 जागा टीआरएसने जिंकलेल्या आहेत. आंध्रप्रदेशातही वायएसआर काँग्रेसची सत्ता आहे. वायएसआरचे नेते जगन मोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात लोकसभेच्या 25 जागा आहेत. त्यापैकी 22 जागांवर वायएसआर काँग्रेस विजयी झालेली आहे.

जेडीएसचं उपद्रव्यमूल्य मोठं

कर्नाटकात जेडीएस हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष कर्नाटकासह केरळातही अस्तित्व ठेवून आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसला कर्नाटकातील लोकसभेच्या 28 पैकी फक्त एकाच जागेवर विजय मिळाला होता. मागच्यावेळी हा पक्ष राज्यात सत्तेत होता. मात्र, ऑपरेशन लोट्समुळे जेडीएसची सत्ता गेली. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पुन्हा कम बॅक करता आलेलं नाहीये. जेडीएसच्या लोकसभेच्या जागा कमी असल्या तरी जेडीएस हा पक्ष किंगमेकर आहे. तो ज्यांच्याकडे जाईल, त्यांचे खासदार निवडून येण्यास बळच मिळणार आहे.

अकाली दल, बसपाचे मौन

अकाली दल आणि बसपा कधाकाळी एनडीए सोबत होते. आता सध्या ते एनडीएपासून दूर आहेत. अकाली दल एनडीएत परत येऊ शकतो असी सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र अकाली दलाची एनडीएत कधी वापसी होणार हे निश्चित नाहीये. तिकडे बसपा सुप्रिमो मायावती यांनीही आपला स्टँड जाहीर केलेला नाहीये. मायावती यांची उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठी ताकद आहे. मायावतींचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. या शिवाय देशभरात बसपाची कमी अधिक प्रमाणात ताकद आहे. त्यामुळे बसपा काँग्रेस आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

एमआयएमचे एकला चलो रे

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमचं मूळ तेलंगनात आहे. ओवैसी हे तेलंगनातील एकमेव खासदार असले तरी तेलंगनात या पक्षाचं वर्चस्व मोठं आहे. याशिवाय बिहार, महाराष्ट्र आणि इतर राज्यातही या पक्षाचं मोठं वर्चस्व आहे. महाराष्ट्रात तर या पक्षाचा एक खासदारही आहे. मुस्लिम मतांची बेगमी हे एमआयएमचे मुख्य असेट आहे. त्यामुळे एमआयएमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.