AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special : जैस्वालांची नाराजी, बच्चूभाऊंचे कडू डोस, सपा, एमआयएम, बविआची वेगळी चाल; आघाडीसाठी राज्यसभा लैच अवघडंय

tv9 Marathi Special : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे राज्यात मंत्री आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र, त्यांनीही शिवसेनेला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

tv9 Marathi Special : जैस्वालांची नाराजी, बच्चूभाऊंचे कडू डोस, सपा, एमआयएम, बविआची वेगळी चाल; आघाडीसाठी राज्यसभा लैच अवघडंय
आघाडीसाठी राज्यसभा लैच अवघडंयImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2022 | 7:00 PM
Share

मुंबई: चार दिवसावर आलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीचं (Rajya Sabha Election) गणित अजूनही महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) बसवता आलेलं नाही. ज्यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं, त्याच अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी आघाडी सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर या आमदारांनी आघाडीला अडचणीत आणलं आहे. आघाडी सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे, समाजवादी पार्टीने अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली आहे. एमआयएमनेही त्यांचे पत्ते खोलले नाहीत. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बविआने थेट भाजपलाच पाठिंबा जाहीर केला आहे. आघाडीची डोकेदुखी एवढ्यावरच थांबलेली नाही. तर खुद्द शिवसेनेचे (shivsena) आमदार आशिष जैस्वाल यांनी निधी वाटप आणि मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक आघाडीला वाटते तितकी सोपी जाणार नसल्याचं दिसून येत आहे.

बविआने थेट सांगितलं…

राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने थेट भाजपलाच पाठिंबा दिला. भाजपला आम्ही मतदान करणार असल्याचं ठाकूर यांनी स्पष्ट केलं. ठाकूर यांच्याकडे तीन आमदार आहेत. बविआने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेला खडबडून जाग आली. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी हितेंद्र ठाकूर यांची काल भेट घेतली. या तीन नेत्यांमध्ये चार तास चर्चा झाली. बंददाराआड या नेत्यांची चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर ना शिवसेनेने प्रतिक्रिया दिली ना हितेंद्र ठाकूर यांनी. त्यामुळे ठाकूर हे भाजपलाच मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेची तीन मते कमी होणार असल्याचं दिसून येत आहे.

कडू डोस

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे राज्यात मंत्री आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र, त्यांनीही शिवसेनेला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. बच्चू कडू हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरु करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडी काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल. राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे दोन मते त्यांच्याकडे आहेत.

सपानेही घेरलं

अल्पसंख्याकांच्या विकासाच्या आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीने महाविकास आघाडील घेरलं आहे. त्यांनी या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीला मोठा झटका बसला आहे. समाजवादी पार्टीचे दोन आमदार आहेत. अबु असीम आजमी आणि रईस शेख हे दोन समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. त्यामुळे समाजवादी पार्टीची ही दोन मतेही हातचे जाण्याची चिन्हे आहेत.

जैस्वालांची नाराजी, काळजी नाही, पण…

शिवसेनेचे नागपूरमधीला आमदार आशिष जैस्वाल यांनी आघाडीवरच नाराजी व्यक्त केली आहे. निधी वाटपात पक्षपातीपणा होत आहे. तसेच काही मंत्री कामामध्येही टक्केवारी मागत असल्याचा आरोप जैस्वाल यांनी केला आहे. जैस्वाल यांनी उघड नाराजी बोलून दाखवली आहे. पण सर्वात आधी मीच आघाडीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. जैस्वाल आघाडीसोबत असले तरी ते नाराज असल्याने आघाडीत धाकधूक असल्याचंही सांगितलं जात आहे.

ती अकरा मते घात करणार?

राज्यसभा निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं असताना आघाडीच्या हातून एक दोन नव्हे तर तब्बल 11 मते निसटताना दिसत आहेत. बविआची 3, सपाची 2, बच्चू कडूंची 2, एमआयएमची 2 ही 9 मते हातातून जाताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यामुळे ही दोन मतेही हातची जाणार की काय अशी परिस्थिती आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावे म्हणून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर 8 जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे आघाडीची धाकधूक वाढली आहे. या दोन्ही नेत्यांना मतदानास परवानगी न मिळाल्यास आघाडीला एकूण 11 मतांचा फटका बसणार आहे. तर, यातील बहुजन विकास आघाडीची तीन मते भाजपला जाणार असल्याने भाजपला तीन मतांचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपची मतांची संख्या 33 वर जाणार असून भाजपला केवळ 8 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.