जोपर्यंत सतेज पाटील घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, धनंजय महाडिकांचं आवाहन

जोपर्यंत सतेज पाटील घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, धनंजय महाडिकांचं आवाहन
सतेज पाटील-धनंजय महाडिक

महापालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. (Dhananjay Mahadik allegation Satej Patil)

Namrata Patil

|

Mar 06, 2021 | 4:56 PM

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक गटामधील राजकारण तापू लागलं आहे. मंत्री सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले आहे. (Kolhapur Municipal corporation election Dhananjay Mahadik allegation on Satej Patil)

नेमका आरोप काय?

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे डीवायपी मॉलमध्ये गाळा आहे. या गाळ्यातील घरफळ्यात महापालिकेची 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या गाळ्यासंदर्भातील माहिती सतेज पाटील यांनी लपवून ठेवली. तसेच महापालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेत कागदपत्रे जाहीर केली आहे.

घरफाळा न भरण्याचे महाडिकांचे आवाहन

सतेज पाटील यांनी येत्या दहा दिवसात फसवणूक केलेली ही रक्कम दंडासह वसूल करावी. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करु, असा इशारा धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत सतेज पाटील पूर्ण घरफळा भरत नाहीत, तोपर्यंत इतर नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

सतेज पाटील सत्तेचा आणि पदाचा वापर करुन हा गैरकारभार केला आहे, असे देखील महाडिक म्हणाले. माझ्या मुलाच्या लग्नावेळी माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातील असून यामागेही पालकमंत्री सतेज पाटील यांचा हात आहे, असा आरोप महाडिक यांनी केला आहे.

सतेज पाटील यांचा स्पष्टीकरण देण्यास नकार 

दरम्यान या सर्व आरोपासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुर्तास या विषयावर बोलायला नकार दिला आहे. यावर महापालिकेचे पदाधिकारी बोलतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.  (Kolhapur Municipal corporation election Dhananjay Mahadik allegation on Satej Patil)

घरफाळा म्हणजे काय? 

एकदा मालमत्ता नावावर झाल्यावर त्या त्या राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था नियमानुसार आणि ठिकाणानुसार तिमाही किंवा सहामाही किंवा वार्षिक मालमत्ता कर मालकाला भरावा लागतो. ग्रामीण भागामध्ये घराच्या मालमत्ता कराला ‘ घरफाळा  किंवा घरपट्टी असे म्हणतात. तर शहरी किंवा नागरी भागांमध्ये तो ‘ प्रॉपर्टी टॅक्स ‘ म्हणूनच सर्वांना माहिती आहे.

कोल्हापुरातील सध्याचं काय चित्र?

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.

तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे

कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)

  • काँग्रेस- 30
  • राष्ट्रवादी- 15
  • शिवसेना- 04
  • ताराराणी आघाडी- 19
  • भाजप- 13
  • एकूण जागा – 81

(Kolhapur Municipal corporation election Dhananjay Mahadik allegation on Satej Patil)

संबंधित बातम्या : 

काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वतंत्र लढणार

Kolhapur Municipal Election | कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर, थेट नोव्हेंबरचा मुहूर्त?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें