KMC election 2022 : काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपा? वाचा, कोल्हापूर महापालिका प्रभाग 18चा लेखाजोखा

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा तिन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

KMC election 2022 : काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपा? वाचा, कोल्हापूर महापालिका प्रभाग 18चा लेखाजोखा
कोल्हापूर महापालिका, वॉर्ड 18Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 5:11 PM

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही या निवडणुकीची (KMC election 2022) जय्यत तयारी सुरू आहे. महापालिकेची मुदत संपली असून यावर्षी निवडणूक होण्याची शक्यता आहे. एकूण 31 प्रभागांमधून 92 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. मागील वेळी 81 जागा होत्या. यावेळी त्रिसदस्यीय प्रभाग (Ward) रचना असणार आहे. त्यामुळे जागांमध्येही बदल झाला आहे. त्याचबरोबर प्रभागनिहाय आरक्षणातही (Reservation) मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांचीही सेफ वॉर्डसाठी धावाधाव सुरू आहे. पालिकेत यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी होते की भाजपाची, याविषयी उत्सुकता आहे. मागील वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तर भाजपा आणि ताराराणी आघाडी हे एकत्र लढले होते. प्रभाग 18मधील स्थिती काय आहे, आरक्षण, लोकसंख्या याविषयी पाहू…

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 18ची शास्त्रीनगर, बुद्ध गार्डन, शास्त्रीनगर ग्राउंड परिसर, पांजरपोळ, छत्रपती शाहू मिल, कोटीतीर्थ तलाव, उदमनगर परिसर, वाय. पी. पोवार नगर परिसर, यादवनगर, अॅस्टर आधार हॉस्पिटल, जवाहर नगर, केएमटी वर्कशॉप बुद्धगार्डन, आबूबकर मस्जीद, शाहूमिल कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 9, सरनाईक वसाहत, शास्त्रीनगर फायर स्टेशन, विश्वकर्मा पार्क अशी व्याप्ती असून पार्वती टॉकीज सिग्नल चौर, आग्नेय मुखी मारुती मंदिर, रेणुका मंदिर ओढ्यावरील पूल, गोखले कॉलेज आदी महत्त्वाचे परिसर आहेत.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 18मधील एकूण लोकसंख्या 18,787 आहे. यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 2558 असून अनुसूचित जमातीची एकूण लोकसंथ्या 59 इतकी आहे. 2011नंतर जनगणना झालेली नाही. कोविडकाळामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आधीच्या लोकसंख्येत वाढलेली संख्या गृहीत धरण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, मात्र ते कोसळले. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा तिन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

प्रभाग 18 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

प्रभाग 18 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

प्रभाग 18 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
ताराराणी आघाडी
इतर

आरक्षण कसे?

मागील वेळी असलेले आरक्षण यंदा बदलले आहे. हा प्रभाग नव्याने करण्यात आला आहे. यानुसार 18 अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.