AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर मनपा निवडणूक : पक्षीय बलाबल, सध्या कुणाकडे किती जागा?

Kolhapur Municipal corporation Election 2021 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सध्याचं बलाबल काय आहे? यंदा कोण बाजी मारणार?

कोल्हापूर मनपा निवडणूक : पक्षीय बलाबल, सध्या कुणाकडे किती जागा?
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार?
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:43 PM
Share

कोल्हापूर : राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची (Mahanagar Palika Election) निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महानगरपालिका , कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal corporation Election 2021), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि वसई-विरार महानगरपालिका या पाच महानगरपालिकांचा कार्यकाळ संपला आहे. या निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. या निवडणुकांमध्ये राज्याचं लक्ष कोल्हापूर महापालिका निवडणूक 2021 कडे (Kolhapur Municipal corporation Election 2021) लागलं आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा तिन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

मागील निवडणुकीत काय घडलं?

गेल्यावेळी भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवलं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना आपल्या सोबत घेतल्याने भाजपच्या तोंडचा घास हिरावला गेला.

गेल्यावेळी भाजप सत्तेत होता त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील यशावर झाला.आता सत्ता नसताना ही तीच किमया साधावी लागणार आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख असलेले महाडिक कुटुंबीय आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जावी असाही एक मतप्रवाह आहे. मात्र बंडखोरीचा धोका असल्यानं सध्यातरी चंद्रकांतदादा ताराराणी आघाडी आणि भाजप अशी युती करण्याच्याच मानसिकतेत आहेत.

विधानसभेचा निकाल

कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. हे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र 2019 च्या विधानसभा निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. शिवसेनेने 6 पैकी 5 जागा गमावल्या. तर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला.

2014 मध्ये ज्या शिवसेना-भाजपने कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या (Kolhapur Vidhansabha Results). त्या युतीला यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये फक्त 1 जागा मिळवता आली. म्हणजे एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला.

कोल्हापुरातील सध्याचं काय चित्र?

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.

तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे

कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)

  • काँग्रेस- 30
  • राष्ट्रवादी- 15
  • शिवसेना- 04
  • ताराराणी आघाडी- 19
  • भाजप- 13
  • एकूण जागा – 81

संबंधित बातम्या 

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा? 

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.