AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवले, राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती; दीपक केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 11:22 AM
Share

कोल्हापूर : राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याआधीही अनेकदा केला आहे. आज पुन्हा एकदा केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय. “आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना संपवली”, असं केसरकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असंही केसरकर म्हणालेत.

2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडवर आहे. अशात जर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रिपद कुणाकडे असणार? एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला जाणार याची सध्या राजकीय वर्तुळाच चर्चा होतेय. त्यावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2024 ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असंही केसरकर म्हणालेत.

मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय. त्यावर दीपक केसकरांनी टीका केलीय. महाराष्ट्र दिनी नेहमी चांगले कार्यक्रम घ्यायचे असतात. आजच्या दिवशी तरी चांगलं आणि सकारात्मक बोललं जाईल अशी अपेक्षा आहे. पण काय होतं ते बघूयात, असं केसरकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या हिताचं बोलले जाईल. महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान जनतेला देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल? हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असंही केसरकर म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावं. कारण त्यांनीच बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. लोकांना संघर्ष करायला लावायचं, त्यांचं अहित करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. जनतेनं समजून घेतलं पाहिजे की हा विरोध राजकीय आहे, असंही केसरकर म्हणालेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...