सर्व्हे : कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

Krishna Sugar Mill Election Karad 2021 survey : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Karad Krishna Sugar Mill Election)  29 जून रोजी होणार आहे.

सर्व्हे : कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?
कृष्णा साखर कारखाना
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:31 PM

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Karad Krishna Sugar Mill Election 2021)  २९ जून रोजी होणार आहे. कोरोंनामुळे तब्बल वर्षभराहूनही अधिक लांबलेल्या या निवडणुकीत आमने-सामने असलेल्या विद्यमान चेअरमन सुरेश भोसले (Suresh Bhosale) तसेच दोन माजी चेअरमन अविनाश मोहिते (Avinash Mohite) आणि इंद्रजीत मोहिते (Indrajeet Mohite) यांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यावर प्रभाव टाकणाऱ्या या कारखान्याचे ४७,१६० सभासद  मतदान करण्यासाठी पात्र आहेत. सुरुवातीला भोसले कुटुंबियांच्या सहकार पॅनलकडे झुकलेल्या या निवडणुकीत तुल्यबळ आव्हान निर्माण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्याचे कारभारी अविनाश मोहिते आणि इंद्रजीत मोहिते यांच्या मनोमिलनासाठी कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या प्रयत्नानंतरही मनोमिलन झाले नाही. पर्यायाने कृष्णेची निवडणूक मागच्यावेळेसारखीच यंदाही तिरंगीच होणार आहे. (Krishna Sugar Mill Election Karad 2021 survey poll result of the strelema who will win  all you need to know)

तिन्ही पॅनलचे नेते कोरोंनाच्या काळातही गावोगावी जाऊन सभासदांच्या गाठी भेटी घेत आहेत. आपापल्या कार्यकळातील कारभारासोबतच विरोधकांच्या कामकाजावर टोकाची टीका करताना दिसून येत आहे. त्यातच राज्यातील दिग्गज नेत्यांच्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या सततच्या बैठकांमुळे निवडणूक अधिक चुरशीची झालेली आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पॅनल :

सहकार पॅनल (Sahakar Panel) :

सहकार पॅनल हे जयवंतराव भोसले यांनी १९८९ साली झालेल्या कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीत स्थापन केले होते. पॅनलने आजपर्यंत १९९९ आणि २०१५ साली विजय मिळवलेला आहे. सत्तेत असताना दोन्ही वेळेस जयवंतराव भोसले यांचे पुत्र डॉ. सुरेश भोसले हे चेअरमन राहिलेले आहेत.

सहकार पॅनलचे सुरेश भोसले यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचा १२ वर्ष कारखाना चालविण्याचा अनुभव, सहकारी संस्था व्यावसायिक रित्या चालवून फायद्यात ठेवण्याचा इतिहास, सोबतच त्यांचे पुत्र अतुल भोसले यांचा कराड तालुक्यातील वाढता राजकीय प्रभाव, सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार सोबत टिकवून ठेवण्यात आलेल यश ह्या सहकार पॅनलच्या जमेच्या बाजू आहेत.

रयत पॅनल (Rayat Panel) :

रयत पॅनल १९८९ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केले होते. १९८९-९९ आणि २००५-१० ह्या १५ वर्षाच्या कालावधीत रयत पॅनल हे सत्तेत राहिलेले आहे. ८९ ते ९९ साली यशवंतराव मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते हे तर २००५ ते १० मध्ये डॉ. इंद्रजित मोहिते हे चेअरमन राहिले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत मात्र मदनराव मोहिते हे सहकार पॅनल सोबत असल्याने रयत पॅनलचे नेतृत्व डॉ. इंद्रजीत मोहिते हे करत आहेत.

डॉ. इंद्रजीत मोहिते यांची जनमानसातील प्रतिमा अभ्यासू असून त्यांनी कारखान्यात नव-नवीन प्रयोग केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोंजनरेशन प्रकल्पाचा समावेश होतो. त्यांची सभासदांचे अभ्यास करून मुद्दे मांडण्याची शैली आणि निवडणुकीच्या दरम्यानच्या त्यांचा व्हिडीओ च्या माध्यमातून त्यांनी सभासदांशी साधलेला संवाद कृष्णाच्या सभासदांमध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे.

संस्थापक पॅनल (Sansthapak Panel):

संस्थापक पॅनलची स्थापना अविनाश मोहिते यांनी २०१० साली केली. दोन्ही पारंपरिक विरोधी पॅनलच्या मनोमिलनानंतर तयार झालेली जागा त्यांनी योग्य रित्या घेतली. त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी घवघवीत यश प्राप्त करत २०१० ते २०१५ दरम्यान चेअरमन पद भूषवले.

या कालावधीत त्यांचा सभासदांशी असलेला थेट संपर्क यामुळे कारखान्याचा २४*७ चेअरमन म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा २ रुपये/किलो प्रमाणे साखर देण्याचा निर्णय त्यावेळी ऐतिहासिक ठरला होता. कुठलही राजकीय पाठबळ नसताना प्रस्थापित पॅनलच्या विरोधात उभा राहिल्याने अविनाश मोहिते यांच्या बद्दल मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येते. अविनाश मोहिते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असून या निवडणुकीत त्यांच्या मागे राष्ट्रवादी पक्ष कशा पद्धतीने उभा राहतो यावर या निवडणुकीचे बरेचशे समीकरणे अवलंबून असणार आहेत. मागील निवडणुकीत सहकार पॅनलला मदत करणाऱ्या ‘उंडाळकर गटाने’ अविनाश मोहिते यांच्या पॅनल ला मदत करण्याची भूमिका जाहीर केली, याचा निश्चितच फायदा संस्थापक पॅनल ला होताना दिसेल.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर थेट प्रभाव टाकणारे महाराष्ट्रातील दिग्गज नेते:

जयंत पाटील (Jayant Patil):  

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे  इस्लामपूरचे आमदार आहेत. कृष्णेचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सर्वच सभासद मतदार हे इस्लामपूर मतदारसंघात येतात. तसेच रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि नेर्ले-तांबवे या गटातून बहुतांश संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते निवडून येत आलेले आहेत. यासोबतच शिराळा मतदारसंघातील काही गावांत कृष्णेचे सभासद आहेत आणि तिथे देखील मानसिंग नाईक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील ३९ गावात कृष्णेचे  जवळपास १४००० सभासद आहेत.  यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेला कृष्णेच्या निवडणुकीत अनन्य साधारण महत्व आहे.

जयंत पाटील यांचे कार्यकर्ते तिन्ही पॅनलमध्ये विखुरलेले असल्याने त्यांची कृष्णेच्या निवडणुकीत भूमिका नेहमीच तटस्थ राहिलेली आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) : 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कृष्णेच्या निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील ५६ गावे व जवळपास २८५०० सभासद आहेत. कराड कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडवे आव्हान दिले होते. यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर प्रभाव टाकणारे प्रमुख नेते असल्याने कृष्णेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका अधिक महत्वपूर्ण होते.

बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil):

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे  कराड उत्तरचे आमदार असून कराड उत्तर मतदारसंघातील १० गावांमध्ये कृष्णेचे जवळपास १५०० सभासद आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सहकार मंत्री असल्याने आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असल्याने  बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

विश्वजित कदम (Vishwajeet Kadam):

विश्वजित कदम हे यशवंतराव मोहिते यांचे नातेवाईक असल्याने आणि कदम-मोहिते घराण्याचे आधीपासूनच एकमेकांना मदत होत असल्याने राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम यांची मदत डॉ. इंद्रजित मोहिते यांना होताना दिसते. विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील २१ गावांमध्ये कृष्णेचे जवळपास ३००० सभासद आहेत. तसेच त्यांच्या भारती विद्यापीठ व इतर संस्थांचे जाळे कृष्णेच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांचीही भूमिका कृष्णेच्या राजकारणात महत्वाची ठरते.  विश्वजित कदम कृष्णेच्या निवडणुकीत सर्वाधिक सक्रिय असून, त्यांचे कार्यकर्ते डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या ‘रयत पॅनल’चा प्रचार करताना दिसून येत आहेत.

द स्ट्रेलेमा (the strelema survey) या संस्थेने नुकत्याच केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात सत्ताधारी सहकार पॅनलला वातावरण अनुकूल दिसून येत आहे. मागील निवडणुकीतील इतिहास पाहता इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या दरम्यान विरोधी मतांचे विभाजन होऊन सत्ताधारी भोसलेंच्या सहकार पॅनलसाठी ही निवडणूक सोयीची होण्याची शक्यता दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या सहभाग आणि त्यातून निर्माण होऊ पाहणाऱ्या विविध समि‍करणाचा विचार करता यंदाची कृष्णेची निवडणूक चुरशीची होणार आहे हे मात्र निश्चित!

2015 साली झालेल्या शेवटच्या निवडणुकीचा निकाल:

एकूण जागा: २१, सहकार पॅनल: १५, संस्थापक पॅनल: ६, रयत पॅनल: ०

विशाल लिंगायत – सहसंस्थापक, द स्ट्रेलेमा 

संबंधित बातम्या  

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा 

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.