Kedar Dighe : स्वर्गीय आनंद दिघे यांनी उभं आयुष्य‌ लोकांची सेवा केली, तेचं संस्कार माझ्यावरती झाले आहेत – केदार दिघे

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 17, 2022 | 4:26 PM

मला स्वत: बाबतीत बोलणं योग्य वाटत नाही .पण दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी काकांना बघितलय. उभं आयुष्य त्यांनी जनतेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत केली.

Kedar Dighe : स्वर्गीय आनंद दिघे यांनी उभं आयुष्य‌ लोकांची सेवा केली, तेचं संस्कार माझ्यावरती झाले आहेत - केदार दिघे
स्वर्गीय आनंद दिघे यांनी उभं आयुष्य‌ लोकांची सेवा केली, तेचं संस्कार माझ्यावरती झाले आहेत - केदार दिघे
Image Credit source: tv9marathi

अहमदनगर : ज्या प्रकारे स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी उभं आयुष्य‌ लोकांची सेवा केली. तशीच सेवा माझ्या हातुन घडावी असे आशिर्वाद साईबाबांकडे मागितल्याचे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी सांगितले. ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे‌ यांनी आज साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी विश्वस्त सचिन कोते यांनी दिघे यांचा संस्थानच्या वतीने शाल , साईबाबांची (Saiababa) मुर्ती ‌देवून सत्कार केला. त्यावेळी तिथं त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आत्तापर्यंत स्वर्गीय आनंद दिघे यांनी ज्या प्रकारे लोकांची सेवा केली आहे. ती पाहता माझ्या हातून देखील तशीच सेवा घडावी केदार दिघे यांनी सांगितलं.

अडीच वर्ष अनेक संकटाचा सामना केला आहे

राज्य आणि देशाने गेल्या अडीच वर्ष अनेक संकटाचा सामना केला आहे. त्याचबरोबर माझी नियुक्ती उद्धवजींनी केली आहे. त्याच अनुषंगाने आनंद दिघेंनी जशी जनतेची सेवा केली तशीच माझ्या हातून जनतेची सेवा घडावी हे आशिर्वाद साईबाबांकडे मागितले असंही दिघे यांनी सांगितलं आहे. वस्तुस्थिती लोकांना माहीती आहे. लोक आपली भावना तीव्र पद्धतीने व्यक्त करत आहेत. त्यामुळे आज विधानसभा सत्रावेळी देखील असच असेल. मोहित कंबोज यांनी काय म्हणटलय हे मी अगोदर बघेल आणि त्यानंतरच बोलेल असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे आणि केदार दिघे तुलना

मला स्वत: बाबतीत बोलणं योग्य वाटत नाही .पण दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी काकांना बघितलय. उभं आयुष्य त्यांनी जनतेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत केली. जी निष्ठा बाळासाहेब , शिवसेना आणि भगव्या प्रती ‌केली शेवटपर्यंत ठेवली तसेच संस्कार माझ्यावर झालेत तशीच सेवा मी देखील करू इच्छितो असं केदार दिघे यांनी स्पष्ट केलं. धर्मवीर बघताना सांगितल होतं दिघे साहेबांच जिवन रेखाटायच असेल तर ते तीन तासाच्या‌ पिक्चर मधून होवू शकत नाही. दिघे साहेबांचे संबंध महाराष्ट्रातील घरा-घरात आहेत. दिघे साहेबांचे जिवन रेखायटच असेल तर त्यांचेवर सिरीज होवू शकेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI