LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी

LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी
Picture

'मै भी चौकीदार हूं' विरोधात तक्रार

मोदींच्या ‘मै भी चौकीदार हूं’ या गाण्यावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे देशातील पहिली तक्रार कोल्हापुरातून दाखल, निवडणूक आयोगाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुलाणी यांनी केली तक्रार

18/03/2019
Picture

माणिकराव कोकाटे उमेदवारीवर ठाम

नाशिक – गिरीश महाजन यांच्या घोषणेनंतरही माणिकराव कोकाटे ठाम, भाजपने तिकीट द्यावे अन्यथा, कार्यकर्त्यांसाठी लढावेच लागेल, कोकाटेंची भूमिका, उमेदवाराची घोषणा होईपर्यंत वाट बघणार, नाशिकमध्ये युतीच्या उमेदवार घोषणेपूर्वीच बंडखोरी नाट्य

18/03/2019
Picture

पुण्यातून गिरीश बापटांना उमेदवारी?

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती, येत्या 2 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

18/03/2019
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल, पर्रिकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

18/03/2019
Picture

राज्यपालांवर निशाणा

राज्यपालांनी राज्यपालांचं काम करावं, पक्षाचं काम करणं बंद करावं, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा गोव्याच्या राज्यपालांवर निशाणा

18/03/2019
Picture

डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार - सूत्र

डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री होणार – सूत्र

18/03/2019
Picture

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी शपथविधी

गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय दुपारी 2 वाजेपर्यंत होणार, दुपारी 3 वाजल्यानंतर शपथविधी

18/03/2019
Picture

नितीन गडकरींची भाजप नेत्यांशी चर्चा

गोव्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत नितीन गडकरींची भाजप नेत्यांशी चर्चा

18/03/2019
Picture

गोव्यात काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल, तर काँग्रेसकडून राज्यापालांना सत्तास्थापनेसाठी पत्र

18/03/2019
Picture

18/03/2019
Picture

गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर काही तासांतच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु, सुदीन ढवळीकर आणि मायकल लोबो यांची मुख्यमंत्रीपदासाठी इच्छा

18/03/2019
Picture

पर्रिकरांचा अखेरचा प्रवास

  मनोहर पर्रिकरांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, पार्थिव घरातून भाजप कार्यालयाकडे रवाना, पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यदर्शनाला गोव्यात येणार, गोव्याच्या सामान्य नागरिकांचीही अंत्यदर्शनासाठी गर्दी

18/03/2019
Picture

पर्रिकरांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पणजीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाठी भाजप कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. गोव्याच्या भाजप कार्यालयाबाहेर अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्रिकरांच्या अंत्यदर्शनासाठी आज गोव्यात येणार आहेत.

18/03/2019
Picture

18/03/2019
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *