LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी

LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी
Picture

काटोल पोटनिवडणुकीला स्थगिती

नागपूर – काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती, चार महिन्यांसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपने निवडणूक रद्द करण्यासाठी केली होती याचिका दाखल, भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालीय जागा

19/03/2019
Picture

बाळू धानोरकरांना काँग्रेसचं तिकीट नाही

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रसकडून बाळू धानोरकर यांना तिकीट नाही, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवार यांना काँग्रेसचं तिकीट निश्चित झाल्याची माहिती, सेना आमदार बाळू धानोरकर यांची काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा लढण्याची इच्छा

19/03/2019
Picture

विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुलगा सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

19/03/2019
Picture

हर्षवर्धन जाधवांचा काँग्रेसला प्रस्ताव

आमदार हर्षवर्धन जाधव काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, हर्षवर्धन जाधव यांचा काँग्रेकडे प्रस्ताव, प्रस्तावावर काँग्रेस विचार करत असल्याची माहिती. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवेंचे जावई

19/03/2019
Picture

नितेश राणे पार्थच्या पाठिशी

पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे

19/03/2019
Picture

6 आरोपींना अटक

CSMT पूल दुर्घटनेतील आरोपी ऑडिटर निरज देसाईसहित ६ आरोपींना अटक

19/03/2019
Picture

पुण्यात कोण?

गिरीश बापट की मुरलीधर मोहोळ, पुण्याचा उमेदवार कोण?

19/03/2019
Picture

पुण्यात सर्व पक्षात संभ्रम

पुणे – पुण्यात लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे गिरीश बापट आणि मुरलीधर मोहळ यांच्यात काँटे की टक्कर, उमेदवार निश्चित नसल्याने भाजपमध्ये संभ्रम, काँग्रेसमध्येही संजय काकडे की प्रवीण गायकवाड यांच्यात चढाओढ, भाजपकडून युवा चेहरा मिळावा अशी वरिष्ठांना मागणी, पुण्यात सर्व पक्षात संभ्रम

19/03/2019
Picture

येवल्यात आचारसंहिताभंगाचा गुन्हा

येवल्यात नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मुरमी ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराची चौकशीच्या मागणीसाठी तहसील कार्यालय परिसरात परवानगी न घेता उपोषणाला बसल्याने गुन्हा दाखल

19/03/2019
Picture

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

19/03/2019
Picture

सोमय्यांची उमेदवारी अडचणीत

– भाजप खासदार किरीट सोमय्यांची उमेदवारी अडचणीत, सोमय्यांसोबत आणखी एका नावाची शिफारस, शिवसेनेच्या विरोधानंतर सोमय्यांची उमेदवारी अडचणीत

19/03/2019
Picture

राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना

राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना, अकलूजमध्ये मोहिते-पाटलांची बैठक

19/03/2019
Picture

भाजपची पहिली यादी आज?

भाजपच्या बैठकांवर बैठका, अद्याप एकही उमेदवार यादी नाही, आजच्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

19/03/2019
Picture

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, मध्यरात्री पावणे दोन वाजता शपथविधी, राज्यपालांकडून सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाईंना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

19/03/2019
Picture

राज ठाकरे मोठी घोषणा करणार?

19/03/2019
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *