Bihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी वाटाघाटी

सलग दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झालेले चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतात.

Bihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी वाटाघाटी
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 12:10 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने आघाडी आणि जागावाटपाविषयी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठी लोजप नेते उत्सुक आहेत. त्यामुळेच लोजप आता एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (LJP wants to project Chirag Paswan as Bihar CM Face)

सलग दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झालेले चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतात. चिराग यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे लोजपचे संस्थापक. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्षाची जबाबदारी मुलाच्या खांद्यावर सोपवली. संसद गाजवणाऱ्या चिराग पासवान यांनी आता बिहारची कमान सांभाळावी, अशी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

“आमच्या पक्षाचे ठाम मत आहे की मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून केली पाहिजे, थेट निवडीद्वारे नव्हे. जर आपण लोकांमधून निवडून आला नसाल, तर तुम्हाला तळागाळाचा कौल मिळत नाही. अद्याप जागावाटपाविषयी मित्रपक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. जेडीयूच्या उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे करण्याचा आमचा प्लॅन-बी आता प्लॅन-ए बनत आहे. आम्ही कठोर लढा देण्यास तयार आहोत.” असे लोजप नेत्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.

बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देण्याचा एनडीएचा मानस दिसत आहे. लोजप आणि जेडीयूमधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत, मात्र पासवान यांनी भाजपच्या बाजूने रहाण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वाटाघाटी सफल न झाल्यास लोजप एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(LJP wants to project Chirag Paswan as Bihar CM Face)

कोण आहेत चिराग पासवान?

  • चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
  • केंद्रीय मंत्री आणि लोजपचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र
  • बिहारमधील जामुई लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा (2014, 2019) खासदारपदी
  • इंजिनिअरिंगनंतर 2011 मध्ये ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण
  • बिहारमधील युवकांना रोजगार देण्यासाठी ‘चिराग का रोजगार’ एनजीओची स्थापना
  • विधानसभा निवडणुकांसाठी ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’ कॅम्पेन सुरु

संबंधित बातम्या :

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक पत्र

(LJP wants to project Chirag Paswan as Bihar CM Face)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.