AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि किर्तीकरांविरोधात भाजप उमेदवार देणार?

मुंबई: शिवसेनेने आपणच मोठा भाऊ असल्याचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीसाठी आग्रही असलो तरी भाजप लाचार नाही, असा इशारा शिवसेनेला दिला असला, तरी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने जिंकलेल्या जागीही भाजपने उमेदवारांची शोधाशोध सुरु केली आहे. जर शिवसेनेसोबत युती झाली नाही तर शिवसेनेने जिंकलेल्या […]

राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि किर्तीकरांविरोधात भाजप उमेदवार देणार?
BJP
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

मुंबई: शिवसेनेने आपणच मोठा भाऊ असल्याचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीसाठी आग्रही असलो तरी भाजप लाचार नाही, असा इशारा शिवसेनेला दिला असला, तरी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने जिंकलेल्या जागीही भाजपने उमेदवारांची शोधाशोध सुरु केली आहे. जर शिवसेनेसोबत युती झाली नाही तर शिवसेनेने जिंकलेल्या जागी उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न भाजपसमोर आहे. त्यातल्या त्यात मुंबईतील तीन जागी भाजपसमोर मोठे पर्याय नसल्याचं दिसत आहे.

शिवसेनेने जिंकलेल्या दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघात भाजपकडे तगडे उमेदवार नाहीत. सध्या दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईत गजानन किर्तीकर खासदार आहेत. त्यांच्याविरोधात उमेदवार उतरवायचाच झाला तर कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजपसमोर आहे. भाजपसमोर काही पर्यायही आहेत, एक तर पक्षातील सदस्यांना उमेदवारी द्यायची किंवा बाहेरुन आलेल्यांना तिकीट द्यायचं, असे पर्याय आहेत.

दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात भाजप आमदार मंगलप्रभात लोढा, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंविरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उत्तर पश्चिम मुंबईत विद्या ठाकूर, दिलीप पटेल अशा नावांचा भाजपकडून विचार सुरु आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा 2014 सारखीच लढत होऊ शकते. शिवसेना पुन्हा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देईल. त्याविरोधात पुन्हा काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवलं जाईल. या दोघांना मनसेकडून बाळा नांदगावकर यांचं आव्हान असू शकतं. गेल्या निवडणुकीत नांदगावकर याच लोकसभा मतदारसंघातून लढले होते. तर आता यामध्ये भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचंही नाव येऊ शकतं

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने इथे अरविंद सावंत यांच्यासारखा नवखा उमेदवार दिल्याने मॅच फिक्सिंग झाल्याची चर्चा होती. पण मोदी लाटेवर स्वार होत अरविंद सावंत इथून विजयी झाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे गेला. काँग्रेसचा बालेकिल्ला यासाठी, कारण इथून काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा तब्बल तीन वेळा निवडून गेले होते. त्यानंतर देवरा यांचा मुलगा आणि राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद देवरा दोन वेळा खासदार झाले. पण अरविंद सावंत यांनी त्यांची हट्ट्रिक पूर्ण होऊ दिली नाही.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातही तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. इथल्या सामजिक प्रश्नांपेक्षा इथलं जातीय समीकरणच निवडून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी कायम ठेवली जाऊ शकते. तर या मतदारसंघातून लढण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अगोदरच जाहीर केलंय. काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नावावर आता शिक्कमोर्तब बाकी आहे.

संबंधित बातम्या

राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार ठरले  

भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निरुपमांची माघार, दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा : शिवसेनेसाठी रामदास आठवले डोकेदुखी ठरणार!   

दक्षिण मुंबई लोकसभा : भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना जागा राखणार?  

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली  

मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका 

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच