लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसने विदर्भातील मतदारसंघांची यादी तयार केली आहे. संभावित उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे अकोल्याची जागा भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली जाणार आहे.

विदर्भात काँग्रेसला सर्वात जास्त आमदार आणि खासदार मिळायचे. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बालेकिल्ला भाजपने हिसकावून घेतला. यामुळे 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आत्तापासूनच रणनिती आखली आहे. लवकरच हे उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विदर्भातील लोकसभेच्या जागांसाटी खालील उमेदवारांची वर्णी लागू शकते. तर प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघ सोडणार असून, आंबेकर यांची नाराजी दूर करण्याची नियोजन काँग्रेसने केल्याची सूत्रांची माहिती आहे.

संभावित उमेदवार

अमर काळे, वर्धा लोकसभामतदार संघ

प्रफुल्ल गुडधे-पाटील, नागपूर लोकसभा मतदारसंघ

नितीन राऊत, रामटेक लोकसभा मतदारसंघ

मुकूल वासनिक, अमरावती लोकसभा मतदारसंघ

माणिकराव ठाकरे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

जीवन पाटील, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

राहुल बोंद्रे, बुलडाणा लोकसभा मतदारसंघ

नामदेव उसेंडी, गडचिरोली लोकसभा मतदारसंघ

विदर्भातील एकूण लोकसभा मतदारसंघ आणि विद्यमान खासदार (एकूण-12)

बुलडाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना

अकोला – संजय धोत्रे, भाजप

अमरावती – आनंदराव अडसूळ, शिवसेना

वर्धा – रामदास तडस, भाजप

रामटेक – कृपाल तुमाने, शिवसेना

नागपूर – नितीन गडकरी, भाजप

भंडारा-गोंदिया – मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

गडचिरोली-चिमूर -अशोक नेटे, भाजप

चंद्रपूर – हंसराज अहिर, भाजप

यवतमाळ-वाशिम -भावना गवळी, शिवसेना

एकूण 12 पैकी शिवसेना-भाजपकडे 11, राष्ट्रवादी – 1 (भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI