राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार ठरले

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई: लोकसभा निवडणूक 2019 साठी महाराष्ट्र काँग्रेसने उमेदवार निश्चितमध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. आघाडीचा 40 जागांचा तिढा सुटला आहे, मात्र 3 जागांवर चर्चा सुरु आहे. असं असताना काँग्रेसने विदर्भातील 9 उमेदवार निश्चित केले आहेत, तर इकडे मुंबईतही दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय […]

राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार ठरले
Follow us

मुंबई: लोकसभा निवडणूक 2019 साठी महाराष्ट्र काँग्रेसने उमेदवार निश्चितमध्ये आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. आघाडीचा 40 जागांचा तिढा सुटला आहे, मात्र 3 जागांवर चर्चा सुरु आहे. असं असताना काँग्रेसने विदर्भातील 9 उमेदवार निश्चित केले आहेत, तर इकडे मुंबईतही दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ गायकवाड यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे.

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. तर दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेच्याच राहुल शेवाळे यांनी तत्कालिन काँग्रेस खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.

वाचा –  दक्षिण मध्य मुंबई लोकसभा : शिवसेनेसाठी रामदास आठवले डोकेदुखी ठरणार!

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा 2014 सारखीच लढत होऊ शकते. शिवसेना पुन्हा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देईल. त्याविरोधात पुन्हा काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवलं जाईल. या दोघांना मनसेकडून बाळा नांदगावकर यांचं आव्हान असू शकतं. गेल्या निवडणुकीत नांदगावकर याच लोकसभा मतदारसंघातून लढले होते.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने इथे अरविंद सावंत यांच्यासारखा नवखा उमेदवार दिल्याने मॅच फिक्सिंग झाल्याची चर्चा होती. पण मोदी लाटेवर स्वार होत अरविंद सावंत इथून विजयी झाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे गेला. काँग्रेसचा बालेकिल्ला यासाठी, कारण इथून काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा तब्बल तीन वेळा निवडून गेले होते. त्यानंतर देवरा यांचा मुलगा आणि राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद देवरा दोन वेळा खासदार झाले. पण अरविंद सावंत यांनी त्यांची हट्ट्रिक पूर्ण होऊ दिली नाही.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातही तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. इथल्या सामजिक प्रश्नांपेक्षा इथलं जातीय समीकरणच निवडून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी कायम ठेवली जाऊ शकते. तर या मतदारसंघातून लढण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अगोदरच जाहीर केलंय. काँग्रेसकडून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नावावर आता शिक्कमोर्तब बाकी आहे.

संबंधित बातम्या 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा : शिवसेनेसाठी रामदास आठवले डोकेदुखी ठरणार!   

दक्षिण मुंबई लोकसभा : भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना जागा राखणार?  

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI