भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निरुपमांची माघार, दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार निश्चित करत आहे. पण स्थानिक गटबाजीमुळे काँग्रेस नेतृत्त्वाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईतही असाच प्रकार समोर आलाय. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवाय मुंबईतील मोठ्या गटाचा संजय निरुपमांना विरोध आहे. मुंबईत काँग्रेसची आढावा बैठक झाली. यामध्ये संजय निरुपमांविरोधात सूर आवळण्यात आला. काही नेते पक्षात …

भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निरुपमांची माघार, दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार निश्चित करत आहे. पण स्थानिक गटबाजीमुळे काँग्रेस नेतृत्त्वाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईतही असाच प्रकार समोर आलाय. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवाय मुंबईतील मोठ्या गटाचा संजय निरुपमांना विरोध आहे.

मुंबईत काँग्रेसची आढावा बैठक झाली. यामध्ये संजय निरुपमांविरोधात सूर आवळण्यात आला. काही नेते पक्षात आले, पण त्यांना पक्षाची संस्कृती कळली नाही, अशा शब्दात निरुपमांवर ताशेरे ओढण्यात आले. संजय निरुपम उत्तर मुंबईमधून निवडणूक लढतात. पण भाजपचे गोपाळ शेट्टी मजबूत उमेदवार असल्याने निरुपम दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात आहेत.

मुंबईत झालेल्या बैठकीत संजय निरुपम यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पण याच जागी कृपाशंकर सिंग निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निरुपम यांना कामत यांच्या जागेवर निवडणूक लढवण्यास पक्षातून विरोध सुरु झालाय.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान इच्छुक आहेत. पण त्यावरुन प्रिया दत्त आणि खान यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रिया दत्त यांच्या समर्थकांनी दत्त यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्वतःच जाहीर केलंय. पण त्यांची मनधरणी करुन निवडणूक लढण्याचा आग्रह करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

मुंबईतील दोन मतदारसंघांचा तिढा जवळपास सुटला

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ गायकवाड यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. तर दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेच्याच राहुल शेवाळे यांनी तत्कालिन काँग्रेस खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *