बसपाऐवजी चुकून भाजपला मतदान, रागाच्या भरात बोट कापले

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी एका मतदाराने बहुजन समाज पार्टी (बसपा) ला मत देण्याऐवजी चुकून भाजपला मत दिल्याने रागाच्या भरात स्वत:चे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातील शिकारपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शिकापूरमधील हुलासन गावात राहणाऱ्या 25 वर्षीय पवन …

बसपाऐवजी चुकून भाजपला मतदान, रागाच्या भरात बोट कापले

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी एका मतदाराने बहुजन समाज पार्टी (बसपा) ला मत देण्याऐवजी चुकून भाजपला मत दिल्याने रागाच्या भरात स्वत:चे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातील शिकारपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

शिकापूरमधील हुलासन गावात राहणाऱ्या 25 वर्षीय पवन कुमार हे बहुजन समाज पार्टीचे समर्थक आहेत. शुक्रवारी देशात पार पडलेल्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पवन कुमार जवळच्या मतदान केंद्रावर गेले होते. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी सपा-बसपासाठीचे उमेदवार योगेश शर्मा यांना मत देण्याचा निश्चय केला होता. मात्र मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर पवन यांनी अतिउत्साहाच्या भरात बसपासमोर बटण न दाबता भाजपसमोरील बटण दाबले. त्यामुळे त्यांचे मत भाजपचे उमेदवार भोला सिंह यांना गेले.

अतिउत्साहाच्या भरात घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे पवन नाराज झाले. घरी आल्यानंतर त्यांना स्वत:वर प्रचंड राग आला. त्यामुळे रागाच्या भरात पवन यांनी मतदान केलेले बोट कापून टाकले. विशेष म्हणजे  यानंतर स्वत:चा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. त्यात त्यांनी घडलेली संपूर्ण घटना सांगितली. तसेच या व्हिडीओत पवनने केलेल्या या चुकीचा त्यांना पश्चातापही होत असल्याचे सांगितले.

शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 95 जागांवर मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरी 66 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणाच्या काही जांगावर मतदान पार पडले. यातील सर्वाधिक 78 टक्के मतदान नोंद पद्दुचेरीमध्ये झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *