AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिर एक बार मोदी सरकार, साडे तीनशे जागा जिंकत पुन्हा एनडीएचीच सत्ता

नवी दिल्ली : पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झालंय. एनडीएने 350 जागांसह घवघवीत यश मिळवलंय. तर यूपीएला केवळ 85 जागांवर यश मिळवता आलंय. काँग्रेसला 50 जागांचा आकडाही गाठता आला नाही. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल अमेठीत लागला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झालाय. भाजपच्या स्मृती इराणी त्यांच्यावर मात केली. उत्तर प्रदेशात […]

फिर एक बार मोदी सरकार, साडे तीनशे जागा जिंकत पुन्हा एनडीएचीच सत्ता
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 7:19 PM
Share

नवी दिल्ली : पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झालंय. एनडीएने 350 जागांसह घवघवीत यश मिळवलंय. तर यूपीएला केवळ 85 जागांवर यश मिळवता आलंय. काँग्रेसला 50 जागांचा आकडाही गाठता आला नाही. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल अमेठीत लागला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झालाय. भाजपच्या स्मृती इराणी त्यांच्यावर मात केली. उत्तर प्रदेशात भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नुकसान सहन करावं लागलंय. पण त्याची भरपाई पश्चिम बंगालमध्ये झाली आहे.

राजस्थान, गुजरात या दोन राज्यात भाजपने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तर मध्य प्रदेशात 29 पैकी 28 जागा भाजपने मिळवल्या. यामध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय. बिहार, झारखंड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला एकही जागा मिळवता आली नाही.

भाजपने पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं होतं. बंगालमधील 42 पैकी 19 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर टीएमसीने 22 जागा राखल्या आहेत. काँग्रेसला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये खातंही उघडता आलं नाही. शिवाय महाराष्ट्रातही फक्त एक जागा मिळाली आहे.

Lok Sabha Election Result Live

[svt-event title=”राहुल गांधी अमेठीतून पिछाडीवर, वायनाडमध्ये आघाडी” date=”23/05/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बालेकिल्ल्यात पिछाडीवर, स्मृती इराणींची आघाडी, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मोदी लाट [/svt-event]

[svt-event title=”ज्योतिरादित्य शिंदे बालेकिल्ल्यात पाच हजार मतांनी पिछाडीवर” date=”23/05/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ] भोपाळमधून भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर आघाडीवर, ज्योतिरादित्य शिंदे गुनामधून 5 हजार मतांनी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा पिछाडीवर” date=”23/05/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा पिछाडीवर, भाजपचे रवीशंकर प्रसाद यांची आघाडी [/svt-event]

[svt-event title=”उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी” date=”23/05/2019,9:34AM” class=”svt-cd-green” ] उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी, सपा-बसपाला मागे टाकत भाजपची मुसंडी, काँग्रेस रायबरेली आणि अमेठीतूनही पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर” date=”23/05/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] कर्नाटक : भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या बंगळुरु दक्षिणमधून आघाडीवर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गातून पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”रायबरेलीत सोनिया गांधी 600 मतांनी पिछाडीवर” date=”23/05/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] उत्तर प्रदेशात व्हीआयपी लढतींमध्ये भाजपची मुसंडी, अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची आघाडी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9 जागांवर काँग्रेसची मुसंडी” date=”23/05/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] बिहार – कन्हैय्या कुमारविरोधात भाजपचे गिरीराज सिंह आघाडीवर, छत्तीसगडमधील 11 पैकी 9 मतदारसंघात काँग्रेसची मुसंडी [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर” date=”23/05/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे दिग्गज पिछाडीवर” date=”23/05/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर, अमेठीतून स्मृती इराणी यांची आघाडी, तर नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर [/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ] स्मृती इराणी आघाडीवर [/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात कोण कोण आघाडीवर? ” date=”23/05/2019,8:40AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात कोण कोण आघाडीवर? अमोल कोल्हे – शिरुर अशोक चव्हाण – नांदेड चंद्रकांत खैरे – औरंगाबाद सुनील तटकरे – रायगड संजय मंडलिक – कोल्हापूर [/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ – शिवसेना विनायक राऊत आघाडीवर [/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”23/05/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, गिरीष बापट आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत कडेकोट बंदोबस्त” date=”23/05/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 हून अधिक पोलीस अधिकारी, CRPF, SRPF, QRT च्या तुकड्या तैनात, त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना थांबण्याच्या वेगवेगळ्या जागा [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हेंचं पोस्टर” date=”23/05/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

संबंधित बातम्या

Lok Sabha Results 2019 LIVE : महाराष्ट्रातील निकालाचे अपडेट्स

महाराष्ट्रात ‘या’ 4 मतदारसंघांचा निकाल सर्वात अगोदर लागण्याची शक्यता

constituency wise election result : मतदारसंघनिहाय निकाल कसा पाहाल?

मोदींपासून ममतांपर्यंत ‘या’ 5 नेत्यांचे 23 मे रोजीचे भविष्य

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.