AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maha CM on Nitin Gadkari letter : गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल, पोलीस महासंचालकांना ‘हे’ आदेश

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत.

Maha CM on Nitin Gadkari letter :  गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल, पोलीस महासंचालकांना 'हे' आदेश
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 14, 2021 | 1:21 PM
Share

मुंबई : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. यात त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना धमक्या देत महामार्गांची कामं बंद पाडणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे असंच दिसतंय.

राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी गडकरींच्या पत्राचा संदर्भ देत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. यात त्यांनी म्हटलं, “केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री निती गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 25 जुलै रोजी एक पत्र लिहिले आहे. ते सोबत पाठवले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातील काही महामार्गाचे काम पूर्ण झालेत, तर काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांमध्ये काम सुरू असताना काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत. विविध नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भांडावून सोडणे आणि त्यांनी न ऐकल्यास काम बंद पाडत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.”

“तात्काळ कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा अहवाल द्या”

“वरील प्रकरणी आपल्याकडे कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत का? तसेच याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करुन द्यावा,” असंही पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या आदेश पत्रात म्हटलंय.

नितीन गडकरी यांच्या पत्रात नेमकं काय?

1. अकोला आणि नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

4. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

5) हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला .विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

हेही वाचा :

उद्धवजी, शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, नितीन गडकरींचं स्फोटक पत्र

महाविकासआघाडी सरकारवर गडकरींचा लेटरबॉम्ब, राज्यातील ‘या’ प्रकल्पांच्या कामात स्थानिक नेते अडथळे आणत असल्याची तक्रार

…तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं

व्हिडीओ पाहा :

Maha CM Uddhav Thackeray order on Nitin Gadkari letter about highway work

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ