Nitin Gadkari letter to Maha CM: महाविकासआघाडी सरकारवर गडकरींचा लेटरबॉम्ब, राज्यातील ‘या’ प्रकल्पांच्या कामात स्थानिक नेते अडथळे आणत असल्याची तक्रार

Nitin Gadkari | अधिकारी किंवा कंत्राटदारांनी त्यांना न जुमानल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेल्याचे नितीन गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Nitin Gadkari letter to Maha CM: महाविकासआघाडी सरकारवर गडकरींचा लेटरबॉम्ब, राज्यातील 'या' प्रकल्पांच्या कामात स्थानिक नेते अडथळे आणत असल्याची तक्रार
उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी

मुंबई: मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम आणि निष्कलंक मंत्री म्हणून लौकिक असलेल्या नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा थेट आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडले जात आहे. अधिकारी किंवा कंत्राटदारांनी त्यांना न जुमानल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेल्याचे नितीन गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ती नेमकी कामं कोणती आणि कुठली ज्यावर गडकरी म्हणतायत शिवसेना नेते दहशत निर्माण करतायत?

1. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

संबंधित बातम्या:

Nitin Gadkari letter to Maha CM : उद्धवजी, शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, नितीन गडकरींचं स्फोटक पत्र

Published On - 12:37 pm, Sat, 14 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI