मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त सापडला आहे. सोमवारी (30 डिसेंबर) महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल (Maha Vikas Aghadi Government Formation activities).

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन

मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त सापडला आहे. सोमवारी (30 डिसेंबर) महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल (Maha Vikas Aghadi Government Formation activities). यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिन्ही पक्षांचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यात कुणाचा समावेश आहे. याविषयी विविध अंदाज बांधले जात आहेत. आता महाविकासआघाडीतील या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करुन आमंत्रण देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे (Maha Vikas Aghadi Government Formation activities).

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मंत्रिपदासाठी निवडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांनी संबंधित आमदारांना सोमवारी शपथविधीसाठी हजर राहण्यास सांगितलं. अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांच्याशी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादी मंत्रीपदाची यादी यावर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या आमदारांना मात्र अद्यापही मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोणताही फोन कॉल आलेला नाही. शिवसेना रात्री 8.30 नंतर मंत्रिपद कुणाला द्यायचं हे निश्चित करणार आहे. त्यानंतरच संबंधित आमदारांना शपथविधीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं जाणार आहे.

“काँग्रेसचं अद्यापही ठरेना, वरिष्ठांशी चर्चा सुरुच”

विशेष म्हणजे काँग्रेसची यादी अद्यापही तयार झालेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरच काँग्रेसची यादी निश्चित होणार आहे. तसेच रात्री 9 वाजता काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंत्र्यांची अंतिम यादी घेऊन मुंबईत येणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस हायकमांड काँग्रेस प्रदेशाध्यपदाची धुरा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपावत अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात जागा देणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची नावं आज रात्री निश्चित होतील. त्यानंतर या नावांची घोषणा होईल. आता केवळ खात्यांचा मुद्दा शिल्लक आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, “काही मंत्रिपदांवर मित्र पक्षासोबत चर्चा सुरु आहे. सर्व व्यवस्थित होईल, अशी आम्हाला आशा आहे. उद्या (30 डिसेंबर) 10 मंत्री शपथग्रहण करतील. यात नवे आणि जुने चेहरे दोघांनाही संधी दिली जाईल.” यावेळ थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांपेक्षा आमच्या सरकारने दहा पटीने चांगला निर्णय घेतल्याचाही दावा केला.

“महाविकासआघाडीचे घटकपक्ष नाराज”

महाविकासआघाडीतील तीन प्रमुख पक्ष आपल्या मंत्र्यांची नावं निश्चित करण्यात गुंतलेले असतानाच दुसरीकडे आघाडीतील घटकपक्ष मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घटक पक्षांशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे घटकपक्षांकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, सीपीएम, बहुजन विकास आघाडी या सर्वच पक्षांचा यात समावेश आहे.

Published On - 9:06 pm, Sun, 29 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI