LIVE : विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनपासून (Nagpur Winter Session) सर्व राजकीय बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LIVE : विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित
Picture

विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित, उद्या 11 वाजता कामकाज सुरु होणार

16/12/2019,12:54PM
Picture

विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ

16/12/2019,12:35PM
Picture

नागपूर येथे विधानसभेच्या कामकाजास 'वंदे मातरम्' ने सुरुवात

16/12/2019,11:23AM
Picture

विधानभवनात टोपी वाॅर, भगवी विरुद्ध पांढरी टोपी

16/12/2019,11:16AM
Picture

सरकारने सावरकरांबद्दल भूमिका स्पष्ट केली, भाजप नेते गिरीश महाजन यांची मागणी

16/12/2019,11:00AM
Picture

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शिवस्मारक प्रकरणावर स्पष्टीकरण

आलेला रिपोर्ट कॅगचा नाही. त्यामुळे 3800 कोटींचे टेंडर 2500 कोटीला केल्यानंतर भ्रष्टाचार कसा होतो हे मला कळत नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेत अनियमितता कशी काय? याबाबतच चौकशी करा, अऩियमितता असेल तर कारवाई करा असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

16/12/2019,10:51AM
Picture

हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) काय होणार, कोणकोणते मुद्दे गाजणार, कसलेले विरोधीपक्ष नेते आणि नवखे मुख्यमंत्री यांच्यामध्ये कसा कलगीतुरा रंगणार, याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

16/12/2019,10:41AM
Picture

भाजपचे सर्व आमदार मी सावरकर लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात दाखल

16/12/2019,10:38AM
Picture

विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड

विधानपरिषदेेच्या विरोधीपक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड निश्चित, थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता

16/12/2019,10:35AM
Picture

भाजप आमदारांचा आक्रमक पवित्रा, ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याचे संकेत आहेत. भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता आहे. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

16/12/2019,10:33AM
Picture

हिवाळी अधिवेशन आजपासून, भाजप आमदार ‘मी सावरकर’चा नारा घुमवणार

16/12/2019,10:30AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *