CM Uddhav Thackeray | करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

CM Uddhav Thackeray | करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की, महाराष्ट्र केल्याशिवाय राहत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला कोरोनाबरोबर करायची आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (22 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळेस ते बोलत होते. maharashatra chief minister uddhav thackeray addressing maharashtra people via video conferencing

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत हुतात्म्यांनी संघर्ष केला नसता, तर आपल्याला राजधानी मिळाली नसती. तो एक संघर्ष होता. त्या संघर्षाचं वेगळ महत्वं होतं. चार दिवसांनंतर 26 नोव्हेंबर येतोय. तो एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा मुकाबला आपल्या बहाद्दर पोलिसांनी, एनएसजीच्या जवानांनी केला. त्या अतिरेक्यांना आपल्या पोलिसांनी आणि जवानांनी तिथल्या तिथे ठेचून टाकलं. एकूणच आपण जेव्हा जेव्हा असा लढ देत आलो आहोत, त्या लढ्यात यश मिळवत आलो आहोत. आपल्यात असलेल्या जिद्दीमुळे आपल्याला यश मिळालं आहे. महाराष्ट्राने करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला या कोरोनाविरुद्ध करायची आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“कार्तिकी वारी गर्दी न करता साजरी करा”

कार्तिकी वारी अवघ्या 4 दिवसांवर आली आहे. कार्तिकी वारी साधेपणाने तसेच गर्दी न करता साजरी करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

विरोधकांना टोला

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा लगावला. राज्यात विरोधकांकडून मंदिरं उघडण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोल लगावला.

कोणताही मोठा निर्णय नाही

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांकडून अशी कोणतीच घोषणा अथवा निर्णय घेण्यात आला नाही.

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

maharashatra chief minister uddhav thackeray addressing maharashtra people via video conferencing

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *