विधानसभा अध्यक्षांची निवड कधी, अध्यक्षपद कोणाकडे?, बाळासाहेब थोरातांनी कोंडी फोडली

विधानसभा अध्यक्षांची निवड (Assembly Speaker Election) या अधिवेशनात होणार की नाही याबाबतची उत्सुकता असताना, आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कोंडी फोडली आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड कधी, अध्यक्षपद कोणाकडे?, बाळासाहेब थोरातांनी कोंडी फोडली
बाळासाहेब थोरात

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड (Assembly Speaker Election) या अधिवेशनात होणार की नाही याबाबतची उत्सुकता असताना, आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कोंडी फोडली आहे.  विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल, असं थोरातांनी सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. येत्या पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होत आहे. (Maharashtra Assembly Speaker Election will be elected in this session said Congress leader Balasaheb Thorat)

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

याच अधिवेशनात अध्यक्षांची निवड 

याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत”

शरद पवार मोठे नेते

शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना पक्षात बंद करण्याची गरज नाही. ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांना भेटणे गैर काही नाही, असं थोरात म्हणाले. तर महामंडळाचे वाटप लवकरच होईल. सर्व कार्यकर्त्यांना त्यातून संधी मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात नवा कृषी कायदा

केंद्राच्या कृषी कायद्यांनी शेतकर्‍यांना फटका बसणार आहे. त्यामुळे नवीन कृषी कायदा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अधिवेशनात तो कायदा येईलच, त्यासाठी आम्ही सर्व घटकांशी बोलत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा असेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचे संख्याबळ

शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 43
तिन्ही पक्षांचे मिळून – 152

महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष

बहुजन विकास आघाडी – 3
समाजवादी पार्टी – 2
प्रहार जनशक्ती पार्टी – 2
माकप – 1
शेकाप – 1
स्वाभिमानी पक्ष – 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1
163
अपक्ष – 8
171

विरोधकांकडे असलेले संख्याबळ

भाजप – 106
जनसुराज्य शक्ती – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 5
एकूण – 113

तटस्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
एमआयएम – 2

VIDEO : बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या 

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On - 12:58 pm, Wed, 30 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI