‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra cabinet Expansion) मुहूर्त अखेर ठरला आहे.

'ठाकरे' सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
Follow us
| Updated on: Dec 29, 2019 | 3:22 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra cabinet Expansion) मुहूर्त अखेर ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Maharashtra cabinet Expansion) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांची यादी तयार झाली आहे. ही यादी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मंत्रिमंडळात बड्या नेत्यांना स्थान मिळणार आहे. यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे दिल्लीत गेले आहेत. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असून शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत (Maharashtra cabinet Expansion) आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे. यावेळी बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल आणि खर्गे यांची भेट घेणार (Maharashtra cabinet Expansion) आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

  • अजित पवार
  • दिलीप वळसे पाटील
  • अनिल देशमुख
  • जितेंद्र आव्हाड
  • नवाब मलिक
  • हसन मुश्रीफ
  • बाळासाहेब पाटील
  • धनंजय मुंडे
  • राजेश टोपे
  • डॉ. राजेंद्र शिंगणे
  • दत्ता भरणे
  • किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

उत्तर महाराष्ट्र के. सी. पाडवी

मराठवाडा अशोक चव्हाण अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र विश्वजित कदम प्रणिती शिंदे

विदर्भ विजय वड्डेटीवार यशोमती ठाकूर

मुंबई अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

मुंबई

रवींद्र वायकर सुनील प्रभू ऍड अनिल परब

ठाणे

प्रताप सरनाईक डॉ.बालाजी किणीकर

कोकण

उदय सामंत दीपक केसरकर भास्कर जाधव

विदर्भ

संजय राठोड आशिष जयस्वाल बच्चू कडू ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले)

उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील दादा भुसे सुहास कांदे

मराठवाडा

अब्दुल सत्तार संजय शिरसाठ डॉ.संदीपन भुमरे राहुल पाटील

पश्चिम महाराष्ट्र

तानाजी सावंत शंभूराजे देसाई प्रकाश अबिटकर

महिला आमदारांमध्ये 

डॉ. नीलम गोऱ्हे मनीषा कायंदे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.