AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : सच्चे दोस्त, पक्के यार! वाढदिवसानिमित्त वाचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जोडणारे धागे…

वाढदिवसानिमित्त वाचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जोडणारे धागे...

Birthday Special  : सच्चे दोस्त, पक्के यार! वाढदिवसानिमित्त वाचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जोडणारे धागे...
| Updated on: Jul 22, 2022 | 8:27 AM
Share

मुंबई : जिथं स्पर्धा आली तिथं नातेसंबंध बाजूला सारून आपलं इप्सित ध्येय गाठण्यासाठीची चढाओढ आली. राजकारणात तर ही स्पर्धा अधिक. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नाती या सगळ्या पलिकडची आहेत. कारण ती जपणारी माणसं तितकी प्रगल्भ अन् वैचारिक आहेत. दोन पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक पण याच दोन पक्षातले नेते एकमेकांचे पक्के दोस्त आहेत. हे नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) . विशेष योगायोग म्हणजे या दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो. अन् त्यांच्यातले गुण त्यांना राजकारणातील इतर नेत्यांपेक्षा वेगळं अन् एकमेकांच्या जवळ आणतात.पक्षा पलिकडे जात राज्याच्या हितासाठी काही व्यापक अन् महत्वाचे निर्णय घेणं, प्रशासनावरची पकड असे त्यांचे गुण महाराष्ट्राला भावते.

दोघेही उपमुख्यमंत्री… एक आजी तर एक माजी…. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पाहूयात त्यांच्या व्यक्तीमत्वाचे काही पैलू…

वक्तृत्व शैली

अजित पवार हे ग्रामिण भागातील नेतृत्व, त्यामुळे त्यांची बोलण्याची शैली सहज सोपी आहे. त्यांचा बाज ग्रामिण आहे. विधिमंडळात बोलताना त्यांचा हाच ग्रामिण ठसका अनेकांना भावतो. तर फडणवीस हे तोलून मापून बोलणारे… त्यांच्या बोलण्यात जरी शहरी लहेजा जाणवत असला तरी त्यांचं भाषण म्हणजे संदर्भांनी भरलेलं असतं.

प्रशासनावरची पकड

प्रशासनावरची पकड या दोनही नेत्यांची जमेची बाजू आहे. एखादा शासनादेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते. त्याकडे दोघांचंही लक्ष असतं.

वक्तशीरपणा

अजित पवार सकाळी लवकर आपल्या कामाला सुरूवात करतात. त्यांचा दौरा असला की प्रशासनालाही भल्या पहाटे अलर्ट राहावं लागतं. तर फडणवीसही वेळेचे पक्के आहेत. त्यांनी दिलेलं काम वेळेतच पूर्ण व्हावं, असा त्यांचा आग्रह असतो. सध्या फडणवीसही सकाळी सात वाजता आपल्या कामाला सुरूवात करतात. त्यामुळे मग निर्णयांचा सपाटा आलाच…

महत्वकांक्षी राजकारणी

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. त्यांना मुख्यमंत्रीपद किती प्रिय आहे, हे महाराष्ट्र जाणतो. तर अजित पवार यांनाही राजकारणात पल्ले गाठायचेत अन् ते त्यांच्या कामाच्या पद्धतीतून दिसतंही. गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांची पाठ सोडायला तयार नाही. तर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयामुळे फडणवीसांच्या नावापुढेही उपमुख्यमंत्री शब्द लागला आहे.

पक्ष राजकारण या सगळ्या पलिकडे जात नातेसंबंध जपणारी ही माणसं… एक आजी तर एक माजी उपमुख्यमंत्री… या दोघांवरही आज शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.