शपथविधीसाठी अजित पवारांचं नाव पुकारलं, आशिष शेलार म्हणाले, “या दादा या”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय आमदारांचं विधानभवनात ( Ashish Shelars comment on Ajit Pawar) स्वागत केलं. अत्यंत उत्साही वातावरणात सुप्रिया सुळेंनी आमदारांना हस्तांदोलन करत, गळाभेट घेत स्वागत केलं.

शपथविधीसाठी अजित पवारांचं नाव पुकारलं, आशिष शेलार म्हणाले, या दादा या
Follow us
| Updated on: Nov 27, 2019 | 11:32 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी (Maharashtra MLA Oath Ceremony) होत आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत आमदारांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय आमदारांचं विधानभवनात ( Ashish Shelars comment on Ajit Pawar) स्वागत केलं. अत्यंत उत्साही वातावरणात सुप्रिया सुळेंनी आमदारांना हस्तांदोलन करत, गळाभेट घेत स्वागत केलं. (Ashish Shelars comment on Ajit Pawar)

सभागृतील ज्येष्ठ सदस्यांच्या शपथविधीने आमदारांचा शपथविधी सुरु झाला. सकाळी 8 वाजता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या शपथविधीने आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. ज्येष्ठतेनुसार विधानसभा सदस्यांनी शपथ घेतली. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पुढच्या बाकावर बसले होते.

सभागृहात शपथविधीसाठी अजित पवारांचं नाव पुकारण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार यांनी “या दादा या” असा आवाज दिला. मात्र अजित पवारांनी कोणताही प्रतिसाद न देता, त्यांनी मौन पाळणं पसंत केलं.

अजित पवारांची घरवापसी

देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं.  या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचे नेते राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. या  ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार निश्चित झालं.

संबंधित बातम्या  

अचानक आलेल्या फोननंतर सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर 

अजित पवारांची ‘घरवापसी’! बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला 

Non Stop LIVE Update
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.