विधानसभेत ‘पाटीलकी’! पाटील आडनावाचे तब्बल 27 आमदार

विधानसभेतील सर्वाधिक पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत, त्यापाठोपाठ शिवसेना-भाजप यांचा क्रमांक लागतो.

विधानसभेत 'पाटीलकी'! पाटील आडनावाचे तब्बल 27 आमदार
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 1:16 PM

मुंबई : विधानसभेमध्ये यावेळीसुद्धा ‘पाटीलकी’ पाहायला मिळणार आहे. कारण एक-दोघं नव्हे, तर ‘पाटील’ आडनाव असलेले तब्बल 27 आमदार विधानसभेवर (Maharashtra MLA with Patil Surname) निवडून आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि बहुजन विकास आघाडी अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे ‘पाटील’ विधानसभेत आवाज उठवणार आहेत.

गेल्या वेळी म्हणजेच 13 व्या विधानसभेमध्ये 23 पाटलांचा समावेश होता. यावेळी संख्येमध्ये चारने वाढ झालेली आहे. शहरी भागात नसला, तरी ग्रामीण भागात पाटील या आडनावाचा दबदबा आहे. मूळ आडनावापुढे पाटील लावणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

विधानसभेतील सर्वाधिक पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीकडून सात पाटील आमदार झाले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना-भाजपचे प्रत्येकी सहा, काँग्रेसचे चार, तर मनसे आणि बविआचे प्रत्येकी एक पाटील आमदार झाले आहेत. दोघा अपक्ष आमदारांचं आडनावही पाटील (Maharashtra MLA with Patil Surname) आहे.

राष्ट्रवादी

1. दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) 2. जयंत पाटील (इस्लामपूर) 3. सुमनताई पाटील (तासगाव) 4. अनिल पाटील (अंमळनेर) 5. बाबासाहेब पाटील (अहमदपूर) 6. बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) 7. राजेश नरसिंग पाटील (चंदगड)

शिवसेना

1. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) 2. किशोर पाटील (पाचोरा) 3. चिमणराव पाटील (एरंडोल) 4. राहुल पाटील (परभणी) 5. शहाजी बापू पाटील (सांगोला) 6. कैलास पाटील (उस्मानाबाद)

भाजप

1. चंद्रकांत पाटील (कोथरुड) 2. राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) 3. रवीशेठ पाटील (पेण) 4. राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर) 5. संतोष दानवे पाटील (जालना) 6. संभाजी निलंगेकर पाटील (निलंगा)

काँग्रेस

1. ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण) 2. कुणाल पाटील (धुळे) 3. माधवराव पाटील जवळकर (हदगाव) 4. पी एन पाटील सडोलीकर (करवीर)

मनसे

1. राजू (प्रमोद) पाटील (कल्याण ग्रामीण)

बविआ

1. राजेश पाटील (बोईसर)

अपक्ष

1. चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) 2. राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ)

Maharashtra MLA with Patil Surname

संबंधित बातम्या :

एक जोडीदार संसदेत, एक विधीमंडळात

खासदारकीला आडवे, आमदारकीला उभे, दिग्गजांचा निकाल काय?

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 288 आमदारांची संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.