Raj Thackeray: डॉक्टरांना म्हणालो, अरे हिप रिप्लेसमेंट वगैरे बोलायचं ना… राज ठाकरेंच्या कोट्यांनी सभागृहात खसखस…

मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Raj Thackeray: डॉक्टरांना म्हणालो, अरे हिप रिप्लेसमेंट वगैरे बोलायचं ना... राज ठाकरेंच्या कोट्यांनी सभागृहात खसखस...
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 2:01 PM

मुंबई : “मला एकाने विचारलं काय झालं. मी म्हटलं हिप रिप्लेसमेंटची ऑपरेशन झालं. ते म्हणाले, हिपरिप्लेसमेंट. कशामुळे. मी म्हणालो, जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी जी माझी लावली ना… म्हटलं बदलायचीच वेळ आली. एकएक काय काय येतात हो. हार्ट रिपलेसमेंट असते. किडनी रिप्लेसमेंट वगैरे वगैरे. एकाने सांगितलं हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार. मी म्हटलं कसं दिसेल. बरं माझं ऑपरेशन म्हणून कोण काढून देईल. साहेब बरं दिसत नाही. माझी घ्या. काय काय प्रश्न विचारतात”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणालेत.  शस्त्रक्रिया होऊन दोन महिने झाले. भयंकर असते ही शस्त्रक्रिया झाली. आधी व्यवस्थित उपचार झाले होते. इंजेक्शन झाले. फिजिओ झाले होते. पण त्यानंतर वर्षभराने पुन्हा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले कोविड झाला होता का. मी हो म्हणालो. तेव्हा त्यांनी सांगितलं जगभरात कोविडमुळे हाडांचा प्रॉब्लेम झाला, असंही राज ठाकरे (Raj Thackeray Surgery) म्हणाले.

मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज ते आज पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलले.

हे सुद्धा वाचा

“डॉक्टर होते आमचे त्यांनी पहिल्या ऑपरेशनच्यावेळी बाहेर आले. पत्रकारांनी विचारलं. ते कुठेही जातात. एखाद्याच्या गेलेल्याच्या घरी जातात. काय वाटतं. काय वाटतंय का.. आमचे सीनियर डॉक्टर होते एकजण. ते बाहेर आले. प्रेसने विचारलं काय झालं. त्याचं काय झालं. राज साहेब टेनिस खेळायला गेले होते अन् ढुंगणावर आपटले. मी म्हटलं आरे तु डॉक्टर आहे ना रे. मी यावेळी रुग्णालयात गेलो. तेव्हा त्यांना म्हटलं मागच्यावेळी सारखं काही बोलू नका. मला म्हणाले साहेब, मागच्या वेळेला मला तर गांडी वर पडले सांगायचं होतं.पण ढुंगणावर पडले आठवलं”, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना सोडतानाच्या प्रसंगाचे वर्णन करताना राज ठाकरे म्हणाले, ‘मी म्हटलं माझं बंड लावू नका. हे सर्व जण एका पक्षात आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलेलो आहे. जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही पक्षात राहत नाही. माझी शेवटची भेट होती. मी आज पर्यंत कधी बोललो नाही. निघताना मनोहर जोशी माझ्यासोबत होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले मीठी मारली आणि म्हणाले जा….

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.