राज ठाकरे मास्क घालत नाहीत! पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 06, 2021 | 7:36 PM

राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अशास्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे मास्क घालत नाहीत! पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय
राज ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अशास्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात 9 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.(MNS anniversary celebrations on March 9 canceled due to increasing outbreak of corona)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’

मराठी भाषा दिनानिमित्तानं शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमालाही राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता. ‘तुम्ही मास्क घातला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज यांनी दिलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विचारलं गेलं. त्यावेळी माझा त्यांना नमस्कार, एवढंच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री जनतेला मास्क घालणे, हात धुणे आणि दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे, या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यांचेच बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण मास्क घालतंच नसल्याचं सांगितल्यानं या गोष्टीची चर्चा चांगलीच गाजली होती.

मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं – राऊत

मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलं. राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सर सलामत तो पगडी पचास तसं आधी जीव महत्वाचा आहे. इस्पितळात गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेव्हा वाटते अरेरे ऐकायला हवे होते…मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला.

संबंधित बातम्या :

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

MNS anniversary celebrations on March 9 canceled due to increasing outbreak of corona