VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

मी मास्क लावणार नाही, हा राज ठाकरे यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. (Raj Thackeray Nashik Mayor remove Mask)

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना
माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना


नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक (Former Nashik Mayor Ashok Murtadak) आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे. (MNS Chief Raj Thackeray Nashik Visit insists former Mayor Ashok Murtadak to remove Mask)

राज ठाकरे कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. मी मास्क लावणार नाही, हा त्यांचा अट्टाहास याआधीही पाहायला मिळाला आहे. मात्र आता त्यांनी मनसेचे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क हटवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकमध्ये विनामास्क नागरिकांना 1000 रुपये दंड केला जातो. त्यामुळे नाशिक महापालिका आणि पोलीस आता राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ 


गर्दी न करण्याचं आवाहन

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावत आहेत. त्यानंतर राज ठाकरे मनसेच्या निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

राज ठाकरे सव्वा वर्षांनी नाशकात

आगामी स्थायी समिती निवडणुकांमध्ये मनसे भाजपसोबत जाणार असल्याने याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकी काय सूचना करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तब्बल सव्वा वर्षाने राज ठाकरे नाशिकमध्ये आल्याने मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते. (MNS Chief Raj Thackeray Nashik Visit insists former Mayor Ashok Murtadak to remove Mask)

राज ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!

“राज्यात सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमध्ये जे मंत्री आहेत किंवा इतर लोक आहेत ते गर्दी करतात. ते धुडगुस घालतात. मात्र, शिवजयंतीसारख्या उत्सवाला नकार दिला जातो. मराठी भाषा दिनाला नकार दिला जातो. जर एवढंच कोरोनाचं संकट येत असेल तर, महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकला. महापालिकेच्या निवडणुका वर्षभारानंतर घ्या. काही फरक पडत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मास्कबद्दल प्रश्न, राज ठाकरे म्हणाले, कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!

(MNS Chief Raj Thackeray Nashik Visit insists former Mayor Ashok Murtadak to remove Mask)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI