Maharashtra News LIVE : पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा

Maharashtra News LIVE : आज राज्यात अचानक हवामानात बदल झाले आहेत. राज्यातील किमान तापमानात अचानक मोठी घसरण झाली आहे. हुडहुडी वाढली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे.

Maharashtra News LIVE : पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा
Big Breaking
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 9:07 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Nov 2026 09:03 AM (IST)

    नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला; पारा थेट १० अंशांवर

    नाशिककरांना हुडहुडी भरवणारी थंडी सुरू झाली आहे. अवघ्या २४ तासांत तापमानात तब्बल ५.२ अंशांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. १५.२ अंशांवर असलेला पारा थेट १० अंशांवर घसरला असून, यंदाच्या हिवाळी हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरलं आहे. उत्तरेकडून वाहणारे कोरडे आणि थंड वारे सक्रिय झाल्याने नाशिकमधील थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील गारवा कमालीचा वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले असून, नागरिकांना आता उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

  • 21 Nov 2026 09:00 AM (IST)

    मिरा रोडमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    मिरा रोडमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्टीला जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने मुलीला बोलावले आणि दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी मुलीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून तिच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याची चेनही काढून घेतली. या प्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


  • 21 Nov 2026 08:51 AM (IST)

    जळगावच्या तापमानात मोठी घट! पारा थेट ८ अंशांवर

    आज अचानक राज्यात वातावरणात मोठी घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. जळगावात एकाच रात्रीत तापमान ८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचून तापमानात घसरण झाली आहे.

  • 21 Nov 2026 08:49 AM (IST)

    ऊसतोडीवर पाहारा देण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर काळाचा घाला

    ऊसतोडीवर पाहारा देण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर काळाचा घाला. पहाऱ्या दरम्यान रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अवस्थेत दोन भावांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. नवनाथ गिराम आणि परमेश्वर गिराम अशी मयत झालेल्या दोन भावांची नावे आहेत. दैठणा ते माळसोनारोड परिसरात ही घटना घडली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • 21 Nov 2026 08:45 AM (IST)

    मक्याच्या गंजीला आग,जवळपास 40 क्विंटल मका जळून खाक

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कडेगाव गावात महिला शेतकरी निर्मला काळे यांच्या 40 क्विंटल मक्याच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण मक्का जळून खाक झाली असून शेत शिवारातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे आग लागली होती. आधीच पावसाअभावी शेती संकटात असताना मोठ्या कष्टाने पिकवलेला आणि साठवून ठेवलेला मका डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने निर्मला काळे यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलंय.


  • 21 Nov 2026 08:40 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता अधिकच भीषण

    नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता अधिकच भीषण असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी कापूस, मका, ज्वारी आणि सोयाबीनची पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून जगवलेली पिके हातची गेली, शेतीवर केलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही. पूर्व भागातील भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. खरीप हंगाम पूर्णतः वाया जात असल्याचे दिसत आहे

  • 21 Nov 2026 08:38 AM (IST)

    वर्सोव्यातील नाना-नानी पार्क वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरणार

    वर्सोव्यातील नाना-नानी पार्क वाचवण्यासाठी आज सकाळी ठीक 11 वाजता नागरिक एकत्र येणार आहेत. आपले पार्क,  झाडे आणि हिरवळीचा निर्दयीपणे होणारा नाश थांबवण्यासाठी आपला आवाज उठवण्यासाठी चला एकत्र येऊया, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील किमान तापमानात अचानक मोठी घसरण झाली आहे. हुडहुडी वाढली असल्याचे दिसत आहे. राज्यात गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे. धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून धुळ्यात 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

कार्तिकी एकादशीनिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यांच्यामवेत हा मान नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला. आज पहाटे अडीच वाजता एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आणि शेतकरी दाम्पत्याने पांडुरंगाची पूजा अर्चना केली. मुख्यमंत्री होतो तेव्हा वारकरी म्हणून आलो होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून आलो, वारकरी म्हणून आलो. बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे असे साकडे शिंदे यांनी विठुरायाला घातले. विठूरायाच्या गजरात आज पंढरपूर नगरी दुमदुमली. हरिनामाचा जयघोष झाला.

कोल्हापूर दूध संघाची निवडणूक चर्चेत असतानाच गोकुळ दूध संघाने दूधाच्या भावात मोठी वाढ केली. ग्राहकांना मोठा दणका दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गोकुळकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासामधील सर्वात मोठी दूध दरवाढ लागू करण्यात आली आहे. गोकुळने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटरमागे 6 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना एकाच वेळी अधिकचे 6 रूपये मोजावी लागली.

ळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील असहकाराचीच चर्चा सध्या रंगली आहे. एकमेकांना हाबाडा देण्यासाठी महायुतीतच जुंपल्याचे दिसून येत आहे. अनेक बडे नेते सध्याच्या राजकीय समीकरण आणि गणितावर नाराज आहेत. एक एक जागा निवडून आणण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन तयारी करत असतानाच स्वपक्षातील नेतेच त्याला सुरूंग लावत असल्याने या नेत्यांसमोरील चिंता वाढली आहे. आता मुक्ताईनगरमधील वादावर यशस्वी तोडगा निघतो का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us