अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला, उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?

सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

अवघ्या देशाची उत्कंठा शिगेला,  उरले फक्त काही दिवस, सत्तासंघर्षाचा  निकाल कधी? वाचा सरन्यायाधीश काय म्हणाले?
supreme court Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटातील आमदार-खासदारांची धाकधुक आणखी वाढली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे एकमेश आशेचा किरण म्हणून ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे पाहिलं जातंय. त्यासोबतच सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे.

सरन्यायाधीश काय म्हणाले?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अर्थात शिवसेना खटल्याचा निकाल याच आठवड्यात संपवायचा आहे, असं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलंय. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याचं म्हटलं जातंय. कोर्टात आज ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतरही कामत यांचा युक्तिवाद सुरु राहील. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवादाला सुरुवात करतील.

सुप्रीम कोर्टात आज काय युक्तिवाद?

  •  सुप्रीम कोर्टात आज सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली.
  •  पक्षात फूट झाली आहे, हा निर्णय राज्यपाल घेऊ शकत नाहीत, असा मोठा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
  •  तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली.
  •  उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना नाही, अशा आशयाचं पत्र राज्यपालांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी बहुमत चाचणीसाठी निमंत्रण दिलं.
  •  राज्यपालांचं ते पत्रच रद्द केलं तर परिस्थिती जैसे थे होईल आणि पुन्हा एकदा सरकार स्थापण्याची प्रक्रिया करता येईल, असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात करण्यात आला.
  •  तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. याद्वारे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवले जाऊ शकतात, असा युक्तिवाद ठाकरे गटातर्फे करण्यात आला.
  •  तर ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध असल्याचा युक्तिवाद केला.
Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.