AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर थंडीत राजकारण पेटलं, राहुल गांधी यांच्या सभेत राडा होणार? हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेने, मुद्दा काय?

हजारो मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. औरंगाबादहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना वाटेत पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता आहे. 

भर थंडीत राजकारण पेटलं, राहुल गांधी यांच्या सभेत राडा होणार? हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेने, मुद्दा काय?
| Updated on: Nov 18, 2022 | 9:20 AM
Share

मुंबईः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू म्हणून आजच्या शेगावच्या (Shegaon) सभेकडे पाहिलं जातंय. काँग्रेस तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते येथे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र दोन दिवसांपासून एका वेगळ्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण चांगलंच पेटलंय. काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यापुढे ‘माफीवीर’ असा मजकूर लिहिल बॅनरबाजी केल्याने पुण्यातलं वातावरणही तापण्याची चिन्ह आहेत.

राहुल गांधींचं वक्तव्य काय?

स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. वाशिम तसेच अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी आपले आरोप अधिक स्पष्टपणे बोलून दाखवले. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. अकोल्यातील पत्रकार परिषदेत तर राहुल गांधींनी तर एक पत्र दाखवलं. ते सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलं होतं, असा दावा केला. मै आपका नौकर रहना चाहता हूं.. असं त्यात लिहिल्याचं राहुल गांधी म्हणालेत…

संदीप देशपांडे काय म्हणाले पाहा-

राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरून भाजप, मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादमध्ये नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित आहेत. येथून मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. औरंगाबादहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना वाटेत पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून मनसे निषेध नोंदवणार आहे.

शेगाव येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास राहुल गांधींची सभा होणार आहे. येथे मोठ्या संख्येने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, कार्यकर्ते जमणार आहेत. जवळपास पाच लाखांची गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

तर मनसे, भाजप आक्रमक झाल्याने हाजरोंच्या संख्येने आंदोलनकर्तेही येथे जमा होत आहेत. ऐन थंडीत राजकीय वातावरण तापल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखणाचे मोठे आव्हान आहे.

शेगावमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्यातून मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दुपारच्या सभेपर्यंत काही राजकीय राडा घडतो की काय, अशी शक्यता पाहता, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.