AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीचं अखेर ठरलं, समोर आला 44-33-23 फॉर्म्यूला; मोठा पेच सुटला!

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता.

महायुतीचं अखेर ठरलं, समोर आला 44-33-23 फॉर्म्यूला; मोठा पेच सुटला!
devendra fadnavis ajit pawar and eknath shinde
| Updated on: Jul 23, 2025 | 7:24 PM
Share

Mahayuti : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र आले असून सध्या सत्तेच्या सिंहासनावर आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी त्यांच्यात अंतर्गत रस्सीखेच चालू असल्याचे बोलले जाते. महायुतीतील नाराजीही अनेकवेळा वेगवेगळ्या मार्गाने समोर आली आहे. दरम्यान, आता महायुतीचा एक नवा आणि महत्त्वाचा फॉर्म्यूला समोर आला आहे.

महायुतीत नेमकं काय ठरलंय?

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता. पण प्रत्यक्ष संधी मात्र दुसऱ्याच नेत्याला दिली गेली. त्यामुळेच तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहेत. यातील काही नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे, तर काही नेत्यांची नाराजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समोर आलेली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील वेगवेगळी महामंडळे फार महत्त्वाची भूमिका निभावत असतात. याच महामंडळाच्या वाटपाबाबत नवा फॉर्म्यूला समोर आला आहे. महायुतीत महामंडळ वाटप ठरले असून या सूत्रानुसार महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

समोर आला 44-33-23 फॉर्म्यूला

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ या सूत्रावर एकमत झाल्याचेही समोर आले आहे.

लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आज-माजी आमदार, विद्यमान तसेच माजी मंत्र्‍यांमधील नाराजी दूर करण्यासाठी लवकरच महामंडळाचे वाटप केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. या महामंडळ वाटपातून महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राज्यात सिडको (CIDCO) आणि म्हाडा (MHADA) यासारखी चर्चेत असलेली आणि महत्त्वाची समजली जातात. या महामंडळांसाठीही महायुतीच्या पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ही महामंडळे नेमके कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर