Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी हितेंद्र ठाकूरांकडे नेत्यांची रिघ ! राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि ठाकूर यांच्यात बंद दाराआड चर्चा

काँग्रेसचे भाई जगताप यांनी बविआचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी हितेंद्र ठाकूरांकडे नेत्यांची रिघ ! राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि ठाकूर यांच्यात बंद दाराआड चर्चा
हितेंद्र ठाकूर, रामराजे नाईक निंबाळकरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:17 PM

विरार : राज्यसभेपाठोपाठ राज्यात आता विधान परिषद निवडणुकीची (MLC Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. यात भाजपचे पाच तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अशावेळी एक एका मतासाठी आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांना प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांनी बविआचे हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

विधान परिषदेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. विरार पश्चिमेतील विवा कॉलेजमध्ये ठाकूर आणि निंबाळकर यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु आहे. साधारण अर्धा तासापासून अधिक वेळ ही चर्चा सुरु आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मत मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या ठाकूर यांच्याकडील चकरा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीत राऊतांचा बविआवर आरोप

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निकालानंतर माध्यमांशी बोलताना बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आणि अन्य तीन अपक्ष आमदारांनी आपल्याला मतदान केलं नसल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हितेंद्र ठाकुरांना अनन्य साधारण महत्व

राज्यसभा असो की विधान परिषद या निवडणुकीत एक एका आमदाराची गरज भाजपसह महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपचा चार जागा निवडून येतील इतकं संख्याबळ या पक्षांकडे आहे. मात्र 10 व्या जागेसाठी राष्ट्रवादीचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होतेय. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआला पुन्हा एकदा अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी काल विरारमध्ये येऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. काल मंगळवारी काँग्रेस नेते तथा विधानपरिषद उमेदवार भाई जगताप यांनी, तर काल भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे आमदार दीपक साळुंखे -पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन आपणाला मत द्यावे अशी विनंती केली आहे.

विधान परिषदेच्या रिंगणात 11 उमेदवार

>> प्रवीण दरेकर – भाजप >> राम शिंदे – भाजप >> उमा खापरे – भाजप >> श्रीकांत भारतीय – भाजप >> प्रसाद लाड – भाजप >> भाई जगताप – काँग्रेस >> चंद्रकांत हंडोरे – काँग्रेस >> सचिन अहिर – शिवसेना >> आमशा पाडवी – शिवसेना >> रामराजे निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस >> एकनाथ खडसे – राष्ट्रवादी काँग्रेस

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.