भाजपच्या गडात ठाकरे सरकारचे अष्टप्रधान!

महाविकास आघाडीच्या मिशनसाठी ठाकरे सरकारने विदर्भातून आपले आठ मंत्री निवडले आहेत.

भाजपच्या गडात ठाकरे सरकारचे अष्टप्रधान!
Follow us
| Updated on: Dec 31, 2019 | 3:25 PM

नागपूर : भाजपचा गड असलेला विदर्भ काबीज करण्यासाठी, महाविकास आघाडीने विदर्भात ‘अष्टप्रधान’ नेमले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणे, विदर्भातील संघटन मजबूत करणे आणि भाजपचा गड असलेला विदर्भ ताब्यात घेणे या महाविकास आघाडीच्या मिशनसाठी ठाकरे सरकारने विदर्भातून आपले आठ मंत्री (Eight Ministers in Vidarbha) निवडले आहेत.

– विजय वडेट्टीवार – नितीन राऊत – सुनील केदार – यशोमती ठाकूर – अनिल देशमुख – बच्चू कडू – संजय राठोड – राजेंद्र शिंगणे

उद्धव ठाकरे सरकारचे हे विदर्भातील अष्टप्रधान आहेत. महाविकास आघाडी सरकाने विदर्भातून मंत्रिपदाची जबाबदारी दिलेले हे सर्व दिग्गज आणि मुरलेले नेते आहेत. या नेत्यांपैकी कुणी 15, तर कुणी 20 वर्षे विधानसभा गाजवली आहे. आता याच अष्टप्रधानांवर भाजपचा गड असलेला विदर्भ काबीज करण्याची जबाबदारी आहे.

महाविकास आघाडी सरकारने विदर्भात सात कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिलं. यातील सर्वाधिक चार कॅबीनेट मंत्री काँग्रेसचे आहेत. विरोधीपक्ष नेते आणि संघ मुख्यालयाचा जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात ठाकरे सरकारचे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. यात नितीन राऊत, सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा समावेश आहे. यातूनच भाजपची पकड असलेल्या जिल्ह्यात संपूर्ण ताकद लावण्याची ठाकरे सरकारची योजना असल्याचं दिसून येत आहे.

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत, त्यापैकी यावेळी 29 जागा भाजपला मिळाल्या, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विदर्भात कुणाचे किती आमदार, कुणाला किती मंत्रिपदं? Eight Ministers in Vidarbha

काँग्रेस – 16 आमदार, 4 मंत्रिपदं राष्ट्रवादी – 6 आमदार, 2 मंत्रिपदं शिवसेना – 6 आमदार, 2 मंत्रिपदं

महाविकास आघाडी सरकारने विदर्भात आठ मंत्रिपदं दिली. शिवाय विधानसभेचं अध्यक्षपदही विदर्भाच्या वाट्याला आहे. खातेवाटपातही गृह, ऊर्जा यासारखी महत्त्वाची खाती विदर्भाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या मिशन विदर्भचं हे पहिलं पाऊल आहे, असंच राजकीय जाणकार सांगतात.

हेही वाचा : पक्षाला आमची लायकी वाटत नसेल : प्रताप सरनाईक

Eight Ministers in Vidarbha

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.