Malegaon Election Result : भाजपाला सर्वात मोठा हादरा, पालिका गेली, दारुण पराभव, इस्लाम पार्टीचा दणक्यात विजय!

Malegaon Municipal Corporation Election 2026 Result : मालेगावात समोर आलेल्या निकालाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. इथे भाजपाला जबर धक्का मिळाला असून इस्लाम पार्टीने विजय मिळवला आहे.

Malegaon Election Result : भाजपाला सर्वात मोठा हादरा, पालिका गेली, दारुण पराभव, इस्लाम पार्टीचा दणक्यात विजय!
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 1:33 PM

Malegaon Municipal Corporation Election Result : राज्यातील सर्व 29 महापालिकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. मुंबई महानगरपालिकेत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीने जोरदार मुसंडी मारली आहे. ही युती एकूण 122 पेक्षा जास्त जागांवर आघाडी वर आहे. शिंदे आणि मनसे यांची युती 70 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. असे असतानाच आता एका आगळ्यावेगळ्या महापालिकेची चर्चा होत आहे. या महापालिकेत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा विरोधी पक्षातील ठाकरे गट, काँग्रेस हे सगळेच मागे पडले आहेत. इथे एका वेगळ्याच पक्षाने धडाकेबाज कामगिरी केली असून या पालिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

मालेगावात भाजपाला जोरदार धक्का

मालेगावच्या महापालिकेत सध्या अजब चित्र पाहायला मिळत आहे. कारण आलेल्या सुरुवातीच्या कलांवरून राज्यात सगळीकडे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळत आहे. परंतु मलागेवच्या महापालिकेत मात्र वेगळ्याच पक्षाने विजयाकडे वाटचाल केली आहे. आतार्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची आकडेवारी पाहता. येथे इस्लाम पार्टी विजयी झाली आहे. विशेष म्हणजे येथे भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. भाजपाला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.

Live

Municipal Election 2026

01:25 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाचा गड गेला, मोठी खळबळ...

01:18 PM

Latur Nagarsevak Election Results 2026 : लातूर महापालिकेतून हैराण करणारी अपडेट...

01:11 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?

01:06 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?

01:29 PM

Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपच ठरतोय सरस, राष्ट्रवादीलाही मोठा फटका

01:21 PM

Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये प्रभाग 24 चा निकाल समोर, कोण जिंकलं ?

मालेगावात कोणाला किती जागा?

मालेगावात भाजपाला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल 18 जागा जिंकल्या आहेत. इस्लाम पार्टीला सर्वाधिक 19 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टीला 5 जागा जिंकता आल्या आहे. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. एमआयएम या पक्षाला चार जागा मिळवत्या आल्या आहेत. तर इतर एका अपक्षानेही येते बाजी मारली आहे. मालगेवाची पालिका जिंकण्यासाठी येथे इस्लाम पार्टी आणि सपाने सेक्यूलर फंड या नावाने आघाडी केली होती. त्यामुळे आता येथे इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांची सत्ता येणार आहे.