AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी घेतलेला निर्णय…, कृषिमंत्रीपद गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खातेबदलानंतर कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांनी घेतलेला निर्णय..., कृषिमंत्रीपद गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर
manikrao-kokate-and-ajit-pawar
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 01, 2025 | 3:48 PM
Share

मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचे खाते बदलले आहे. त्यांच्याकडून कृषी खाते काढू घेतले असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले आहे. या खातेबदलानंतर कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निर्णय मला मान्य – कोकाटे

खातेबदलानंतर बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, त्यांच्याकडे खातं दिल्यामुळे न्याय होईल. दत्तामामा भरणे यांना काही मदत लागली तर मी मदत करणार. मला काही मदत लागली तर त्यांचा सल्ला घेणार.मी अजिबात नाराज नाही’ असं विधान केलं आहे.

कैलास पाटील यांची टीका

कोकाटेंचं खात बदलल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं की, सभागृहात ऑनलाइन गेम खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी खाते बदलून देणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपरिहार्यता दाखवून देणारं आहे. एकीकडे राज्यातील कृषी क्षेत्राचे धिंडवडे निघाले असताना कृषीमंत्री विधानभवनात उघडपणे पत्ते खेळतात, शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करतात, त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलून दिले जाते, हे म्हणजे राज्य सरकारकडून त्यांना गैरवर्तनाच बक्षीस दिल्यासारखेच आहे..

सामन्य कर्मचाऱ्यांनी असं काही केलं असत, तर त्याला निलंबित केलं असतं. परंतु मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त विभाग बदलून दिला जातो. मुख्यमंत्री महोदय, हे ताकद टिकवून ठेवायचं आणि जोडीतोडीच राजकारण तर नाही ना? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना की, जर एखादा चांगला मंत्री असता तर तो एका मिनिटात राजीनामा देऊन मोकळा झाला असता. पण आता माणिकराव कोकाटेंना दुसरं पद दिलं गेलं , याला आपण कारवाई म्हणणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स