सेना-भाजप एकत्र आल्यास उत्तम, उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, सेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे (Manohar Joshi on BJP & Shiv Sena alliance).

Manohar Joshi on BJP & Shiv Sena alliance, सेना-भाजप एकत्र आल्यास उत्तम, उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, सेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे (Manohar Joshi on BJP & Shiv Sena alliance). शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं (Manohar Joshi on BJP & Shiv Sena alliance).

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपसोबतची युती तोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन केलं. शिवसेना आता खूप पुढे गेली आहे. मात्र तरीही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सेनेचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले मनोहर जाशी यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम होईल, असं विधान केल्याने, राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे.


मनोहर जोशी नेमकं काय म्हणाले?

“भाजचे आणि आमचे संबध आज चांगले राहिले नाहीत हे खरं आहे. पण या दोन पक्षांनी पुन्हा एकत्र यावं ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण सध्या पक्षाची तशी इच्छा नाही. जशी आमची इच्छा नाही तशीच त्यांचीही इच्छा नाही. आज आम्ही एक नाहीत, याचा अर्थ आम्ही पुन्हा कधीच एकत्र येणार नाही असं नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील”, असं मनोहर जोशी म्हणाले.

उद्धव  ठाकरे यांनी याआधीच भाजपवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकारही स्थापन केलं आहे. अशातच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त केलेली ही इच्छा राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच सध्या खातेवाटपाचा पेचही शिल्लक असल्यानं या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *