AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी डिफेंडर गाडी परत केल्यानंतर जे घडलं त्याची सगळीकडे चर्चा, नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील जी डिफेंडर गाडी वापरत होते की पुन्हा तिच्या मालकाकडे सोपावली आहे. ही गाडी परत केल्यानंतर जे घडलं त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी डिफेंडर गाडी परत केल्यानंतर जे घडलं त्याची सगळीकडे चर्चा, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 11:43 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सतत चर्चेत असतात. मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान एका लग्झरी डिफेंडर कारने फिरत होते. ही कार पाहून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही गाडी पुन्हा तिच्या मालकाकडे सोपावण्याचा निर्णय घेतला. आता मनोज जरांगेंनी डिफेंडर गाडी परत केल्यानंतर जे घडलं त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेली डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. माळशिरस तालुक्यातील संगम येथे मराठा बांधव आणि महिलांनी या गाडीचे औक्षण करून अनोखे स्वागत केले. मनोज जरांगे पाटील ज्या आसनावर बसले होते, त्या आसनाचेही औक्षण करून पूजा करण्यात आली. गाडी पाहण्यासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली होती. अनेक जण गाडीला स्पर्श करत, फुले वाहत आणि फोटो काढत होते. यावेळी जरांगे पाटलांप्रती समर्थकांच्या भावनिक जिव्हाळ्याचे दर्शन घडले.

संगम येथील या स्वागतातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाजाकडून मिळत असलेल्या पाठिंब्याची आणि भावनिक जोडणीची स्पष्ट झलक दिसून आली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील ही डिफेंडर गाडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली होती. ही गाडी आपली नसून एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. गाडीचे मालक सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर अंतरवालीत दाखल झाल्यानंतर डिफेंडर परत करण्याचा निर्णय घेतल्याने या गाडीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मनोज जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? जरांगेंच्या मुलाकडे दोन लाखाचा मोबाईल कुठून आला? जरांगे उपोषण सोडत असताना तिथे ठेकेदार कसे आले? या ठेकेदारांचा विखे पाटलांशी संबंध काय? अशा प्रश्नांची सरबत्तीच अजय महाराज बारस्कर यांनी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता जरांगेंनी ते वापरत असलेली डिफेंडर परत केल्याचे दिसत आहे.

Follow Us
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...