नोंदी रद्द करण्याचे बावनकुळेंचेच आदेश, आता भाजपचे 15-20 आमदार पाडणार; मनोज जरांगे संतापले
Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी प्रमाणपत्र रद्द करायला लावल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील केला. त्यानंतर आता त्यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी या नोंदी करण्याचे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे, एका बावनकुळेंसाठी भाजपचे 15-20 आमदार पाडणार असा धमकी वजा ईशारा देखील दिला आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेत आहात. बावनकुळे (नोंदी) रद्द करायला सांगतो. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हिच नोंद ग्रामपंचायतमध्ये लावली. तुमचा (म्हणजे bjp) निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला. पुढे जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले. “सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील… तेवढे दाखवत आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी endoncement करून पत्र दिलं. 15 लाख रुपये द्या म्हणतात, ऑफ रेकॉर्ड बोलतात. 15 लाख रुपयासाठी रद्द करता का?” असे ते म्हणाले.
वाचा: 20 रुपयांची असो किंवा 120 रुपयांची; डी-मार्टमध्ये मॅगी स्वस्त का मिळते? सीक्रेट आलं समोर
भाजपवर जोरदार टीका?
पुढे मनोज जरांग पाटील म्हणाले की, “बावनकुळेंसाठी 15-20 आमदार पाडून टाकीन. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका.” जरांगे पाटील यांनी ज्योती सुधाकर शिंदे यांची संपूर्ण वंशावळ दाखवली. मला आयुष्यात शिंदे साहेब यांच्यावर संशय येत नव्हता. मी संजय शिरसाठ, विलास भुमरे, सामंत यांना मुंबईत दवाखान्यात सांगितलं होत. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही डबल गेम करू नका. मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्याच ऑफिसला कसे काय येतात? तुम्ही मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला सांगता? तुमच्या सांगण्यावरून आंदोलन होत.