AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार-शरद पवारांची युती… ‘या’ निवडणुकीत संयुक्त गट, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या

मात्र आता शेलार यांच्याशी युती झाल्यावर शरद पवार गटातील अध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप पाटील आणि अन्य उमेदवारांच्या MCA तील भवितव्याचे काय होणार ? असा प्रश्न आहे.

आशिष शेलार-शरद पवारांची युती... 'या' निवडणुकीत संयुक्त गट, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 10, 2022 | 4:29 PM
Share

दिनेश दुखंडे, मुंबईः अवघ्या मुंबईचं लक्ष लागलेल्या एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या निवडणुकीची समीकरणं अचानक बदलली आहेत. कारण निवडणुकीत भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी युती केल्याचं नुकतंच जाहीर केलंय. खरं तर राजकीय शत्रुत्वाचा या निवडणुकांवर फारसा परिणाम होत नाही, मात्र सध्याचं धगधगतं राजकारण पाहता, ते कुठपर्यंत झिरपू शकतं, कुणाचे कुठे हितसंबंध गुंतलेले असू शकतात हे हा उत्सुकतेचा विषय ठरतोय. त्यामुळेच एमसीए निवडणुकीतलं हे चित्र सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.

MCA कार्यकारिणी निवडणुकीत आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कार्यकारिणी निवडणुकीत अचानक कलाटणी मिळाली आहे. शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्याशी युती केल्याचं पत्र जारी झालंय. या दोहोंचा संयुक्त गट जाहीर करण्यात आलाय. या दोघांच्याही स्वाक्षरीचे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आलंय. हा गट जाहीर करण्याआधी शरद पवार आणि आशीष शेलार यांची दक्षिण मुंबईत भेट झाली. या भेटीनंतरच पवार-शेलार संयुक्त गटाचा निर्णय झाल्याचं म्हटलं जातंय.

Jitendra Awhad

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. शरद पवार यांच्या गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अर्ज भरला आहे.

letter

मात्र आता शेलार यांच्याशी युती झाल्यावर शरद पवार गटातील अध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप पाटील आणि अन्य उमेदवारांच्या MCA तील भवितव्याचे काय होणार ? असा प्रश्न आहे.

पवार-शेलार संयुक्त गटात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांच्यासह पवरांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हेही आहेत.

आधी जाहीर झालेल्या शरद पवार गटातील बहुतांश उमेदवार पवार-शेलार गटात नाहीत

शरद पवार गटातील उमेदवार अजिंक्य नाईक यांचा पवार-शेलार गटात सेक्रेटरी पदावर कायम आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?